शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात पाणीप्रश्नावरून रंगला कलगीतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:31 IST

सटाणा : शहरातील भीषण पाणीटंचाईमुळे नगराध्यक्षपदाचा राजीनामा मागणाऱ्या माजी आमदारांनी दोनवेळा आमदारकी तसेच अनेक वर्षे नगराध्यक्षपद भूषवूनही शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी का सोडवला नाही, असा प्रतिप्रश्न सटाण्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देखुले आव्हान नगराध्यक्षांकडून पत्राव्दारे देण्यात आले आहे.

सटाणा : शहरातील भीषण पाणीटंचाईमुळे नगराध्यक्षपदाचा राजीनामा मागणाऱ्या माजी आमदारांनी दोनवेळा आमदारकी तसेच अनेक वर्षे नगराध्यक्षपद भूषवूनही शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी का सोडवला नाही, असा प्रतिप्रश्न सटाण्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी उपस्थित केला आहे.माजी आमदार संजय चव्हाण यांनी राजीनामा मागीतल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष मोरे यांनी त्यांना आव्हान दिले असून, पाणी योजना पूर्णत्वास न गेल्यास आपण एकही निवडणूक लढवणार नाही, असे स्पष्ट करून तुम्हीही अशी हिम्मत दाखवाल का? असे थेट आव्हान चव्हाण यांना दिले आहे.शहरातील भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर माजी आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी केली होती. त्यास प्रत्युत्तरादाखल नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी चव्हाण यांना थेट पत्र लिहिले असून, ते प्रसिद्धीसही दिले आहे. माझा राजीनामा मागण्याची नैतिकता तुमच्याकडेही नाही. पाण्यासाठी शहर आणि तालुक्यातील जनतेने आपल्याला एकदा नाही, तर दोनदा आमदारकी दिली आहे, असे नगराध्यक्ष मोरे यांनी पत्रात म्हटले असून त्यांनी पत्रात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. जनतेने मुदतपूर्व राजीनामा मागितला तरी तो तत्काळ देण्याची माझी तयारी आहे; पण आपण मात्र एवढी वर्र्षं सत्ता उपभोगूनही शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवू शकला नाहीत म्हणून राजीनामा देणार का? असे खुले आव्हान नगराध्यक्षांकडून पत्राव्दारे देण्यात आले आहे.