शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळ्यात वाढणार पाणीपुरवठा

By admin | Updated: August 7, 2014 02:03 IST

कुंभमेळ्यात वाढणार पाणीपुरवठा

 

नाशिक : पुढील वर्षी भरणारा कुंभमेळा हा जागतिक दर्जाचा सोहळा असणार आहे. त्यामुळे वर्षभर येणाऱ्या भाविकांचा आणि पर्वणीच्या दिवशी वाढणारा ताण लक्षात घेऊन महापालिकेने मूलभूत सेवांचे नियोजन केले आहे. त्यानुसार पाणीपुरवठ्यात ७२ दशलक्ष लिटर्सने वाढ करण्यात येणार आहे. त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्यात येणार असून, वैद्यकीय केंद्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे. महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी ही माहिती दिली.नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यानुसार कामे सुरू करण्यात आली आहेत. यंदाच्या कुंभमेळ्यात तीन ते साडेतीन लाख भाविक येतील; परंतु त्याचबरोबर पर्वणी काळ आणि अन्य महत्त्वाचे दिवस बघता सव्वा कोटी भाविक येतील, असा यंत्रणांचा अंदाज आहे. २०११ च्या जनगणनेनुसार नाशिकची लोकसंख्या सध्या १५ लाख आहे. त्याचा विचार केला तर सात ते आठ पटीने अधिक नागरिक या शहरात येणार असल्याने नागरी सोयीसुविधांवर ताण पडणार असून, त्याचदृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. कुंभमेळ्यात म्हणजे पुढील वर्षापर्यंत म्हणजे २०१५ पर्यंत नाशिकची लोकसंख्या १८ लाख असेल. शहराची सध्याची अनुमानित पाण्याची मागणी ३७० दशलक्ष लिटर्स असून, साधुग्रामकरिता अनुमानित मागणी ३० दशलक्ष लिटर्स इतकी आहे. कुंभमेळ्याची पर्वणी आणि अन्य दिवसांचा विचार करता ७२ दशलक्ष लिटर्स पाणी प्रतिदिन लागणार आहे. म्हणजेच एकूण ४७२ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा रोज केला जाणार असल्याची माहिती महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी दिली. पालिकेच्या कुंभमेळा आराखड्यात पाणीपुरवठ्यासाठी ९६ कोटी रुपयांची तरतूद असून, त्यानुसार कामे सुरू आहेत. नाशिकरोड जलशुद्धिकरण केंद्राची क्षमता १८ दशलक्ष लिटर्सने, तर पंचवटी विभागातील जलशुद्धिकरण केंद्रांची क्षमता ५० दशलक्ष लिटर्सने वाढविण्यात येणार आहे. साधुग्रामसाठी तर विशेष व्यवस्था करण्यात येणार असून, त्यादृष्टीने दोन जलकुंभ बांधणी व अन्य नियोजन सुरू आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पूर्व विभाग, पंचवटी, सातपूर येथे प्रत्येकी एकेक, तर नाशिकरोड येथे तीन आणि सिडकोत आठ जलकुंभ बांधण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले.नाशिक येथे येणाऱ्या भाविकांचा विचार केला, तर ते केवळ स्नान करून जातील असे नाही. काही भाविक पर्वणीच्या व्यतिरिक्तदेखील येणार असल्याने त्याचे नियोजन करण्यात येत असून, शहरातील धर्मशाळांखेरीज पालिकेच्या शाळा इमारती, समाजमंदिरे, तसेच विविध मंगल कार्यालयांमध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे. शहरात मंगल कार्यालये आणि लॉन्स मोठ्या प्रमाणात असून, त्यांनी सेवाभावी वृत्तीने ती द्यावीत अशी अपेक्षा आहे. तसे झाल्यास निवासाचा मोठा प्रश्न सुटणार आहे, असे सांगून महापौर म्हणाले, कुंभमेळ्यात आरोग्य व्यवस्था हा एक मोठा आव्हानात्मक भाग राहणार आहे. दहा हजार तात्पुरती शौचालये बांधण्याबरोबरच स्वच्छतेसाठी खास व्यवस्था केली जाणार आहे. त्याचबरोबर येणाऱ्या साधू-महंतांसाठी साधुग्राममध्ये तात्पुरत्या स्वरूपात रुग्णालयाची व्यवस्था असेलच; शिवाय अन्यत्रदेखील वैद्यकीय व्यवस्था असेल. त्यानुसार प्रतिबंधात्मक वैद्यकीय सेवेअंतर्गत शहरी आरोग्य केंद्र नऊ, प्रजनन व बाल आरोग्य केंद्रे सात, बाह्यरुग्ण सेवेसाठी एकूण आठ दवाखाने, चार फिरते दवाखाने असणार आहेत. बाह्य व आंतररुग्ण सेवा प्रतिबंधात्मक सेवेअंतर्गत सहा रुग्णालये आणि पाच प्रसूतिगृहे अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, वैद्यकीय सेवा पुरेशा प्रमाणात देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कार्यरत संस्था यांच्याकडून प्रतिनियुक्तीवर कर्मचारी घेण्यात येणार आहेत.