शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

अण्णा भाऊ साठेनगरला टँकरद्वारे पाणीपुरवठा

By admin | Updated: April 4, 2017 02:13 IST

इंदिरानगर : वडाळागाव येथे विद्युत मोटारीने पाणी खेचण्याची स्पर्धा सुरू असल्याने अण्णा भाऊ साठेनगरात ऐन उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे

इंदिरानगर : वडाळागाव येथे विद्युत मोटारीने पाणी खेचण्याची स्पर्धा सुरू असल्याने अण्णा भाऊ साठेनगरात ऐन उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. परंतु अद्यापही पाणीपुरवठा विभागाच्या वतीने विद्युत मोटारी जप्तीची आणि दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात येत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.वडाळागावात झीनतनगर, मेहबूबनगर, आलिशान सोसायटी, रहेमतनगर, गणेशनगर, जय मल्हार कॉलनी, सावित्रीबाई झोपडपट्टीसह परिसरात काही नागरिक मुख्य जलवाहिनीला विद्युत मोटारी लावून पाणी खेचत असल्याने परिसरात कृत्रिम पाणीटंचाई समोर जावे लागत असल्याची तक्रार त्रस्त नागरिकांनी केली आहे. गतवर्षी गंगापूर धरणात अत्यंत कमी जलसाठा असतानाही पाणीपुरवठा सुरळीत होता. यंदा धरणात मुबलक जलसाठा असतानाही पाणीपुरवठा विभागाच्या वितरण आणि यांत्रिक विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.अण्णा भाऊ साठेनगरमध्ये सुमारे सातशे नागरिकांची वस्ती आहे. बहुतेक लोक मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु महेबूबनगरसह परिसरातील काही नागरिकांनी जलवाहिनीस सर्रासपणे विद्युत मोटारी लावून पाणी खेचण्याचा प्रकार सुरू केला आहे. त्यामुळे अण्णा भाऊ साठेनगरसह परिसरात नळाला अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. पिण्यापुरतेही पाणी भरले जात नाही. त्यामुळे एक दिवसाची मजुरी सोडून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्रस्त नागरिकांची दखल घेत नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. तसेच तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत .