शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
4
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
5
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
6
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
7
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
8
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
9
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
10
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
11
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
12
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
13
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
14
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
15
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
16
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
17
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
18
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
19
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
20
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश

भाताच्या रोपांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST

नांदूरवैद्य : पावसाचे माहेरघर व धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे भाताची रोपे ...

नांदूरवैद्य : पावसाचे माहेरघर व धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे भाताची रोपे पिवळी पडू लागल्याने त्यांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांवर टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

पाऊस नसल्याने यंदाचे वर्ष कसे जाणार, याची चिंता आता तालुक्यातील शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. यावर्षी 'ना पाऊस ना धान्य' अशी काहीशी स्थिती निर्माण झाली असून, भाताची रोपे पिवळी पडत असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील नांदूरवैद्य येथील शेतकऱ्यांवर भाताच्या रोपांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

भारताची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात महिनाभरापासून पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या सोयाबीन, भात, भुईमूग, नागली, वरी, खुरासनी आदी पिके संकटात सापडली आहेत. महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यातील ऐन बहरात येणारी व आलेली भातशेती संकटात सापडली असून, सध्या भाताच्या रोपांची वाढ खुंटली आहे. भातासह इतर रोपांना याकाळात पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. मात्र, पाऊसच गायब झाल्यामुळे भाताची रोपे पिवळी पडत असल्यामुळे भातशेती संकटात सापडली आहे. बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. त्यामुळे जोरदार पाऊस होण्याची प्रतीक्षा लागली आहे. भाताच्या रोपांचे नुकसान होऊ नये म्हणून नांदूरवैद्य येथील शेतकऱ्यांनी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करत रोपांना जीवनदान दिले आहे. धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या तालुक्यातील धरणांनीदेखील तळ गाठला असल्याने धरणांना जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. दरम्यान, पावसाअभावी तालुक्यात काही भागात भाताची रोपे करपू लागली असून, याचा परिणाम पुढील काळात होणाऱ्या उत्पादन क्षमतेवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला सरासरी ९७ टक्के पर्जन्यमान होईल, असा अंदाज वर्तवला होता. या आनंद वार्तामुळे बळीराजा सुखावला होता. त्यानुसार जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. मात्र, त्यानंतर जिल्ह्यातील चार ते पाच तालुके वगळता इतर तालुक्यांमध्ये अद्याप दमदार पाऊस पडलेला नाही. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

----------------

इगतपुरी तालुक्यातील धरणांच्या जलसाठ्याची सद्यस्थिती.

धरण. दशलक्ष घनफूट. टक्के

दारणा ३२४८ ४५.४३

भावली धरण -. ६२५ . . ४३.५८

मुकणे धरण -. १७७३ २४.९९

कडवा धरण -. २३६ १३.९८

भाम धरण. -. १७८ . ७.२४

---------------------

नांदूरवैद्य येथे भाताची रोपे पिवळी पडत असल्यामुळे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करतांना शेतकरी. (०८ नांदूरवैद्य १)

080721\08nsk_3_08072021_13.jpg

०८ नांदूरवैद्य १