शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
2
पुतिन यांनीच फोडला 'बॉम्ब'! तेल खरेदी करण्यावरुन भारतावर निर्बंध, पण स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
3
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला कोणतेही पद नको; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
4
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
5
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
6
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
7
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
8
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
9
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
10
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
11
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
12
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
13
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
14
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
16
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
17
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
18
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
19
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
20
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना

ममदापूर राखीव क्षेत्रात पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 22:58 IST

नाशिक : जिल्ह्यातील येवला तालुक्यात माणसांना पिण्याच्या पाण्याची भ्रांत पडली असून, उन्हाची तीव्रता अन् पाण्याच्या दुर्भिक्षामुळे येथील मुक्या प्राण्यांच्या जिवाची काहिली होत आहे. वन्यजिवांच्या तृष्णेची जाणीव शहरातील ‘इको-एको फाउंडेशन’च्या स्वयंसेवकांना झाली आणि त्यांनी भूतदयेतून का होईना, या स्वयंसेवकांनी ममदापूर राखीव वनसंवर्धन क्षेत्रातील कोरडेठाक पाणवठे भरण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे.

ठळक मुद्दे वन्यजीव संवर्धनाच्या दिशेने पडते पाऊल : ‘इको-एको’ने जाणल्या मुक्या जिवांच्या संवेदना

नाशिक : जिल्ह्यातील येवला तालुक्यात माणसांना पिण्याच्या पाण्याची भ्रांत पडली असून, उन्हाची तीव्रता अन् पाण्याच्या दुर्भिक्षामुळे येथील मुक्या प्राण्यांच्या जिवाची काहिली होत आहे. वन्यजिवांच्या तृष्णेची जाणीव शहरातील ‘इको-एको फाउंडेशन’च्या स्वयंसेवकांना झाली आणि त्यांनी भूतदयेतून का होईना, या स्वयंसेवकांनी ममदापूर राखीव वनसंवर्धन क्षेत्रातील कोरडेठाक पाणवठे भरण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे.कथित वन्यजीवप्रेमी, पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमींची संख्या कमी नाही. यामुळे जे खरेखुरे प्रामाणिकपणे ‘प्रेमी’चे कर्तव्य बजावतात, त्यांच्याकडेदेखील समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि तसे होणे स्वाभाविकही आहे. मुक्या जिवांची तृष्णा भागावी जेणेकरून दुष्काळाचे ते बळी ठरू नयेत आणि वन्यजीवप्रेमी म्हणून आपले कर्तव्याची जाणीव ठेवून इको-एको फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी आपपसात वर्गणी गोळा करून ममदापूर-राजापूर राखीव संवर्धन क्षेत्रातील कोरडेठाक झालेले पाणवठे पाण्याने भरण्याचा उपक्रम हाती घेतला.गुढीपाडव्याच्या दिवशी या स्वयंसेवकांनी ही आगळीवेगळी गुढी उभारून रविवारी (दि.७) संवर्धन क्षेत्र गाठले. या भागात पाण्याच्या टॅँकरची आगाऊ नोंदणी करून घेत स्वयंसेवकांनी पाणवटे भरण्यास सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात दोन पाणवटे उभारलेल्या निधीतून भरणे शक्य झाल्याचे अभिजित महाले यांनी सांगितले; मात्र समाजातील दानशुरांनाही सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे. मेअखेरपर्यंत या भागातील पाणवटे संस्थेने दत्तक घेतले असून, हा उपक्रम पहिल्या पावसापर्यंत सातत्याने राबविण्याचा मानस महाले यांनी व्यक्त केला.अडीच हजारांचा एक टॅँकरयेवला तालुक्यात पाणी ‘महाग’ झाले आहे. पाणी मिळणे या भागात दुरापास्त झाल्यामुळे पाण्याचे टॅँकर ‘भाव’ खाऊन जात आहे. शासनाच्या टॅँकरचा मुबलक पुरवठा होत नसून खासगी टॅँकरची किंमत अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत आहे.राखीव संवर्धन क्षेत्र सुमारे साडेचार हजार हेक्टरवर आहे. या भागात वनविभागाकडून दररोज केवळ दोन टॅँकरद्वारे पाणवठे भरले जातात; मात्र उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे टॅँकरची संख्या या क्षेत्रात वाढविण्याची मागणी होत आहे.