शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नऊ गावांना ५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 23:53 IST

पेठ : मे महिन्याने मध्यान्ह गाठल्याने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबरोबर पाणीटंचाईने डोके वर काढले असून, पेठ तालुक्यातील ७३ गावे व ३० वाड्या अशा १०३ गावांचा टंचाईग्रस्त आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. सात गावे व दोन वाड्यांना पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

पेठ : (रामदास शिंदे) मे महिन्याने मध्यान्ह गाठल्याने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबरोबर पाणीटंचाईने डोके वर काढले असून, पेठ तालुक्यातील ७३ गावे व ३० वाड्या अशा १०३ गावांचा टंचाईग्रस्त आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. सात गावे व दोन वाड्यांना पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.पेठ तालुका तसा नाशिक जिल्ह्यात पर्जन्यमानाच्या दृष्टीने जवळपास दुसऱ्याक्रमांकावर असतो. मात्र प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती व सिंचन प्रकल्पांचा अभाव यामुळे जानेवारीपासून बहुतांश गावांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागतात. सुदैवाने मागील वर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत मागील वर्षाच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. पेठ तालुक्यात सद्यस्थितीत तोंडवळ, शिदमाळ, हनुमंतपाडा (भू.), आमडोंगरा, डोंगरशेत, मोहपाडा, सादडपाडा (रान.), घुबडसाका, उखळीमाळ, रानविहीर या गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, तिळभाट, वैतागपाडा, खोकरतळे, नवापाडा, अंबास, सादडपाडा (सु.), मोहालीपाडा, सातपुतेपाडा आदी गावातील खासगी विहिरींचे अधिग्रहण करून नागरिकांची तहान भागवली जात आहे.उपविभागीय अधिकारी दिंडोरी यांच्याकडे दुसºया टप्प्यातील जांभूळमाळ, घोटविहिरा, मानकापूर, चिरेपाडा, बोरीचीबारी, मांडणपाडा, निरगुडे, भिंतघर या गावांचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार संदीप भोसले, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, उपअभियंता वसंत गवळी आदी टंचाई निवारणासाठी प्रयत्नशील आहेत.-----------------------------शिराळे धरणात पुरेसा साठा पेठ शहराच्या पाचवीला पूजलेली पाणीटंचाई शिराळे धरणामुळे कायमची मिटली असून, सद्यस्थितीत पेठ शहराला पाणीपुरवठा करणाºया शिराळे धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने पेठवासीयांची टंचाईपासून मुक्तता झाली आहे. शिवाय पाहुचीबारी, हरणगाव, गावंधपाडा, इनामबारी, पाटे, शिंदे आदी लहानमोठ्या धरणात पाणीसाठा असल्याने परिसरातील गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे.२ सोशल नेटवर्किंग फोरम यासारख्या सामाजिक संस्थेने शेवखंडी, खोटरेपाडा, वाजवड, केळबारी, वडपाडा आदी गावांना मोफत पाणीपुरवठा योजना राबवत टंचाईच्या खाईतून बाहेर काढले आहे. आपली आपुलकी बहउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून उद्योजक दौलत कुशारे व नंदा कुशारे यांनी अतिदुर्गम बोंडारमाळ या गावाची ७० वर्षांपासूनची पाण्याची तहान भागवली.

----------------------------------------

पेठ तालुक्यातील १०३ गावांसाठी संभाव्य टंचाई आराखडा पंचायत समिती लघु पाटबंधारे व महसूल विभागाच्या समन्वयाने तयार करण्यात आला असून, प्राधान्यक्र माने टंचाईग्रस्त गावांना ५ टँकरद्वारे व खासगी विहीर अधिग्रहीत करून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. संभाव्य टंचाई निर्माण होणाऱ्या गावांसाठी तालुका प्रशासनाने उपाययोजना केली असून, कोरोनाच्या संकटात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही यासाठी प्रशासन काम करीत आहे.- संदीप भोसले, तहसीलदार, पेठ

टॅग्स :Nashikनाशिक