शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

चांदवड तालुक्यात ११ गावे २१ वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 19:04 IST

चांदवड : चांदवड तालुक्यात ११ गावे,२१ वाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत असुन दररोज ३ टॅँकर द्वारे ११ फेऱ्या मारण्यात येत आहे.मार्च महिन्याच्या मध्यावरच चांदवड तालुक्यातील बऱ्याच गावावर विहिरी,बोअरवेल,जलसाठे कोरडे ठाक पडल्याने बºयाच भागात पाणी टंचाईची तीव्रता वाढत आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईची तीव्रता वाढत आहे.

चांदवड : चांदवड तालुक्यात ११ गावे,२१ वाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत असुन दररोज ३ टॅँकर द्वारे ११ फेऱ्या मारण्यात येत आहे.मार्च महिन्याच्या मध्यावरच चांदवड तालुक्यातील बऱ्याच गावावर विहिरी,बोअरवेल,जलसाठे कोरडे ठाक पडल्याने बºयाच भागात पाणी टंचाईची तीव्रता वाढत आहे.चांदवड तालुक्यात ४ गावे व ५ वाड्यांना ३ टॅँकर द्वारे पाणी पुरवठा सुरू असून ५ गावे ५ वाड्यांचे प्रस्ताव प्रांतकार्यलयात पाठविल्याची माहिती गटविकास अधिकारी हिरामण मानकर व पाणीपुरवठा अधिकारी मोरे यांनी दिली.चांदवड तालुक्यातील गत पावसाळ्यात मागील वर्षाच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्याने मार्च महिन्याच्या मध्यावर तालुक्यातील जलसाठ्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.त्यामुळे तालुक्यातील हिरापूर,बोपाणे,कळमदरे,परसूल या चार गावांसह हिरापूर येथील धनगरवाडी,तळेगावरोही येथील दत्तवाडी,घुमरेवस्ती,बजरंगनगर व काजीसांगवी येथील दुर्गानगर या ५ वाड्यांना ३ टॅँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे.चांदवड येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या साडेसहा लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभातुन टॅँकरच्या दररोज ११ फेºया होत आहेत.शासनाकडे मागणी करण्यात आलेल्या टंचाईग्रस्त गावातील प्रस्तावांच्या मंजुरीअगोदर त्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे की नाही याची शहानिशा केल्यानंतरच प्रस्ताव सादर करा असे प्रशासनाचे निर्देश असल्यानेच तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्यामार्फेत संयुक्त पाहणी केली जात असून आवश्यक तेथे टॅँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी मंजूरी देण्यात येत आहे.टंचाईग्रस्त गावांना तात्काळ टॅँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे.