शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव तालुक्यातील ११ गावे व ४९ वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 18:44 IST

मालेगाव : तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी व चारा टंचाईच्या झळा ग्रामीण भागाला बसू लागल्या आहेत. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे.

मालेगाव : तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी व चारा टंचाईच्या झळा ग्रामीण भागाला बसू लागल्या आहेत. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. तालुक्यातील ११ गावे व ४९ वाड्यांची तहान टॅँकरच्या सहाय्याने भागविली जात आहे. तालुक्यातील लघु प्रकल्पांमध्ये उपलब्ध जलसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. धरणांमधील पाणी चोरण्यांवर कायद्याचा बडगा उगारला जात आहे.तालुक्यात पाणी टंचाईने रौद्ररुप धारण केले आहे. पावसाळ्यात केवळ १७५ मीमी पाऊस झाला आहे. जलस्त्रोत कोरडेठाक पडले आहे. अत्यल्प पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. दिवसागणिक वाढत्या उन्हामुळे शेती शिवारातील विहिरींनी तळ गाठला आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांसह ग्रामपंचायतीच्या स्थानिक पाणीपुरवठा योजना कोलमडून पडल्या आहेत. तालुक्यातील मेहुणे, दुंधे, टाकळी, सावकारवाडी, वºहाणे, झाडी, निंबायती, चौकटपाडे, निमगाव, चोंढी, नगाव दिगर आदि गावांना दररोज टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच विविध गावांच्या ४९ वाड्यांना टॅँकर सुरू करण्यात आले आहे. दररोज ३२ खेपांद्वारे ११ गावे व ४९ वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील तळवाडे व संगमेश्वर भागातील दोन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. एका बोअरवेलचा ताबा घेण्यात आला आहे. येथून टंचाईग्रस्त ११ गावे व ४९ वाड्यांना टॅँकर भरुन पाणीपुरविले जात आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी एक शासकीय व दहा खाजगी टॅँकर लावण्यात आले आहेत. गरजेनुसार टॅँकरच्या संख्येत वाढ केली जाणार आहे. भविष्यात तीव्र पाणीटंचाई तालुक्याला जाणावणार असून टॅँकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Waterपाणी