शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
2
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
3
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि यहुदींवरही परिणाम
4
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
5
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
6
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
7
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
8
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
9
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
10
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
11
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
12
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
13
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
14
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
15
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
16
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
17
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
18
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
19
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
20
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 

सप्तशृंगगडावर पाणीटंचाई

By admin | Updated: February 9, 2017 22:56 IST

चिंता चैत्रोत्सवाची : भवानी पाझर तलावाने गाठला तळ

सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर पाणीपुरवठा करणाऱ्या भवानी पाझर तलावाने तळ गाठला असून, फेब्रुवारी महिन्यापासूनच सप्तशृंगगडवासीयांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. आता तर भवानी पाझर तलावाने अक्षरश: तळ गाठला आहे. सध्या सप्तशृंगगडावर दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.गतवर्षी मुसळधार पावसामुळे सप्तशृंगगडाला पाणीपुरवठा करणारा भवानी पाझर तलाव भरल्यामुळे किमान ८ ते ९ महिन्यांचा गडावरील पाणीप्रश्न सुटणार या आशेने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण होते. परंतु या पाझर तणावाला मोठ्या प्रमाणात गळती सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाऊन आता अक्षरश: तळ गाठला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात चैत्रोत्सव यात्रा सुरू होत असून, लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्या पार्श्वभूमीवर पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. ही बाब ओळखून सप्तशृंगगडचे उपसरपंच गिरीश गवळी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य जगन बर्डे, राजेश गवळी, गणेश बर्डे व ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने सहकार राज्यमंत्री दादा भुसे, पालकमंत्री गिरीश महाजन याच्याकडे वारंवार पाझर तलाव दुरुस्तीसाठी निवेदन देऊन निधीची मागणी केली. परंतु आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता आर. बी. धूम, शाखा अभियंता के. एस. सोनवणे, पी. आर. गुंजाळ यांनीही तलावाची प्रत्यक्ष पाहणी केली; मात्र ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ अशी अवस्था या भवानी पाझर तलावाची झाली आहे. यात्रा कालावधीत पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरचा विचार केला जातो; एकदा यात्रा झाली की परत इकडे कुणी ढुंकूनही बघत नाही. आता चैत्रोत्सव यात्रा तोंडावर आली असून, लाखो भाविक गडावर येणार असल्याने टॅँकरने पाणी पुरेसे मिळणार का? मे महिन्याच्या सुट्यांत दररोज हजारो भाविक दर्शनाला येतात. त्यांना अक्षरश: पाच रुपये प्रतिग्लासप्रमाणे पाणी विकत घ्यावे लागते. भाविकांची आणि ग्रामस्थांची पाण्यासाठीची होणारी हेळसांड थांबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)