शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भोजापूरचे पूरपाणी न सोडल्यास आगामी निवडणूकांवर बहिष्कार पाणीटंचाई : फुलेनगर, दुशिंगपूर ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 17:53 IST

सिन्नर : तालुक्यातील दुष्काळाचे सावट असलेल्या पूर्व भागातील अतिअवर्षणग्रस्त फुलेनगर, दुशिंगपुर परिसर भोजापूरचे पुरपणी पोहचत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

सिन्नर : तालुक्यातील दुष्काळाचे सावट असलेल्या पूर्व भागातील अतिअवर्षणग्रस्त फुलेनगर, दुशिंगपुर परिसर भोजापूरचे पुरपणी पोहचत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. भोजापूरचे पूरपाणी तत्काळ सोडून माळवाडी व दुशिंगपूर हे दोन्ही पाझर तलाव तातडीने भरून द्यावे. अन्यथा आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकू असा गंभीर इशारा दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी दिला आहे. जिल्हाधिकाºयांना भेटून दोन्ही गावच्या शिष्टमंडळाने याबाबत लेखी निवेदन दिले आहे.दुशिंगपूर व फुलेनगर ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन तसा ठराव मंजूर केला आहे. पूर्व भागातील माळवाडी व दुशिंगपुर पाझर तलावामधील पाणी योजनांसाठी भोजापूर धरणातील काही पाणी आरक्षित केले जाते. याशिवाय याभागासाठी पूरपाणी सोडणे आवश्यक आहे. असे असतांना पाटबंधारे विभागाकडून त्याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पूर्व भागासाठी आरक्षित असलेले पाणी आणि पूरपाणी दरवर्षी नियमाप्रमाणे मिळावे, पूरचारी फोडून पाणी वळविणाºयांवर गुन्हे दाखल करावे. अशी मागणी शिष्टमंडळातील पदाधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांकडे केली. गेल्या अनेक वर्षांपासून दुशिंगपुरचा पाझरतलाव भोजापूरच्या पूरपाण्याने भरलेला नाही. दरवर्षी पावसाळ्यात भोजापूर धरण ओव्हरफ्लो होते, त्याचे पुरपाणी आवर्तन स्वरु पात चारी नंबर ४ ला सोडले जाते. याबाबत लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कालवा निरीक्षक, पाटकरी यांच्याकडे तक्रार करूनही संबंधित अधिकारी व कर्मचारी डोळेझाक करत आहे. परिसरातील शेती डोळ्यादेखत ओसाड होत आहे. तर माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचेही हाल होत आहे. वारंवार निवेदने देऊन हक्काचे पाणी मिळत नसल्याने दुशिंगपूरसह फुलेनगर व परिसरातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर दुशिंगपुर व फुलेनगर येथे ग्रामसभा घेऊन प्रामुख्याने भोजापूरचे पुरपाणी दुशिंगपुर बंधाºयात पोहचण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. प्रशासनाने दखल घेवून या परिसरात पूरपाणी सोडण्यात यावे अन्यथा आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकू असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांना भाऊसाहेब घोटेकर, कानिफनाथ घोटेकर, भास्कर कहांडळ, नितीन अत्रे, रमेश ढमाले, विजय शिंदे, किरण अत्रे, रविकिरण पठाडे आदींनी निवेदन दिले.

टॅग्स :Waterपाणी