शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी तालुक्यात नियोजनाअभावी पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:37 IST

दिंडोरी : तालुक्यात वाघाड, आळंदी डॅम, पालखेड, ओझरखेड, करंजवण, पुणेगाव आदी धरणे असूनही काही भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, केवळ नियोजनाअभावी तहान भागत नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देपाणीपुरवठा योजना ठप्प : महाराष्टÑ जीवन प्राधिकरण मंडळाचा अनागोंदी कारभार

दिंडोरी : तालुक्यात वाघाड, आळंदी डॅम, पालखेड, ओझरखेड, करंजवण, पुणेगाव आदी धरणे असूनही काही भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, केवळ नियोजनाअभावी तहान भागत नसल्याचे चित्र आहे.एप्रिल महिन्यात पूर्वभागातील अक्राळे, खतवड, पालखेड, आंबे दिंडोरी, खडक सुकेणा, कोराटे या गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने योजना राबवली होती. या गावांमध्ये जलकुंभसुद्धा बांधून तयार आहे; परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अनागोंदी कारभारामुळे अजूनही योजना पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे या भागातील ग्रामपंचायतींना ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईची सर्वात भीषण समस्या अक्राळे येथे आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला उन्हाळ्यात अत्यल्प पाणी असते. त्यामुळे पाणी भरण्यासाठी महिलावर्गाला मध्यरात्री उठून कसरत करावी लागत आहे. या गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे गावात असलेल्या जलकुंभात स्वखर्चाने पाणी टाकून पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. गावातील ग्रामस्थ आपल्या मळ्यातून गावात पाणी घेऊन येतात; परंतु ज्यांच्याकडे काही सुविधा उपलब्ध नाही, त्यांना पाणी मिळविण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागत आहे.गावाजवळच सध्या औद्योगिक वसाहतीचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यासाठी पालखेड धरणावरून स्वतंत्र जलवाहिनी टाकून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्या योजनेतअक्राळे गावचादेखील समावेश करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जवळच असणाºया मोहाडी ग्रामपंचायत हद्दीतील गणेशगावालासुद्धा ऐन एप्रिल महिन्यात तीव्र पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. गावात असणाºया नळ पाणीपुरवठा योजनेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जानोरी, मोहाडी, ओझर, साकोरे या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु गणेशगाव उंचावर असल्यामुळे अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्याद्वारे नळांना दहा ते पंधरा मिनिटेच पाणी येते. त्यामुळे पाणी भरण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीचा आसरा घ्यावा लागतो. या विहिरीत उन्हाळ्यात अत्यल्प पाणी असल्यामुळे महिलांना पाणी मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. तालुक्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या तशी कमी आहे. उन्हाळा आला की नियोजन आराखडा आखला जाता,े मात्र त्यांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही.दिंडोरी तालुक्यात चिकाडी, तळेगाव दिंडोरी, तळेगाव वणी, मानोरी, गवळवाडी, चिंचखेड आदींसह इतर गावे असून, आत्तापर्यंत पाणीटंचाईचा प्रस्ताव कोणत्याही गावाकडून आलेला नाही. पुढील काही दिवसात टंचाई जाणवण्याची शक्यता असल्याने वरील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी तहसील कार्यालय व पंचायत समिती प्रशासन प्रयत्न करत आहे.