शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘पाणीटंचाई’ने स्वच्छ भारत अभियान ‘धुतले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 17:40 IST

सिन्नर : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत सिन्नर तालुक्यात आजपर्यंत सुमारे साडेतेरा हजार वैयक्तिक लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळाले आहे.

सिन्नर : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत सिन्नर तालुक्यात आजपर्यंत सुमारे साडेतेरा हजार वैयक्तिक लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळाले आहे. कोट्यावधी रुपयांचे अनुदान वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी मिळाले असले तरी तालुक्यात पाणीटंचाईने सदर अभियान धुवून काढल्याचे चित्र आहे. अनेक गावे व वाड्यावस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची भ्रांत आहे तेथे शौचालयाच्या वापरासाठी मुबलक पाणी कोठून मिळणार? त्यामुळे अनेक गावांतील वैयक्तिक शौचालये भंगार वस्तू साठवणुकीचे केंद्र बनल्याचे चित्र आहे.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने २०११-१२ मध्ये केलेल्या पायाभूत सर्वेक्षणात तालुक्यात १७ हजार १७२ कुटुंबाना वैयक्तिक शौचालयाची गरज होती. २०१३-१४ साली वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून ४ हजार ६०० रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळत होते. १५ आॅगस्ट २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. त्याबरोबरच वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी गावोगावची कुटुंबे पुढे येऊ लागली. आजपर्यंत सिन्नर तालुक्यातील १३ हजार ३५९ कुटुंबियांना प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. या अनुदानापासून अद्याप ४ हजार कुटुंब दूर आहेत. त्यांचे प्रस्तावही जिल्हा परिषदेकडे सादर झाले असून त्याचे अनुदानही प्राप्त झाले असून त्याचे लवकरच वितरण केले जाणार आहे.सिन्नर तालुक्यात साडेतेरा हजार कुटुंबियांना वैयक्तिक शौचाालयांचा लाभ मिळाला असली तरी त्याचा वापर ही चिंताजनक बाब म्हणावी लागेल. तालुका अवर्षणग्रस्त असल्याने अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे शौचालयांचा वापर कितपत होते हा संशोधनाचा विषय ठरावा. अनेकांना प्रोत्साहनपर अनुदान घेतले आहे.

टॅग्स :Waterपाणी