शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

हागणदारीमुक्ती योजनेला पाणीटंचाईची आडकाठी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 01:13 IST

लखमापूर : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये तापमानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे शासनाच्या हागणदारीमुक्त योजनेला पाणीटंचाईची आडकाठी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देअनेक गावांमध्ये लोटा बहाद्दरांचे दर्शन

लखमापूर : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये तापमानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे शासनाच्या हागणदारीमुक्त योजनेला पाणीटंचाईची आडकाठी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.शासनाने हागणदारी मुक्तीसाठी विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. या योजनांची प्रशासकीय यंत्रणेच्यावतीने काटेकोर अंमलबजावणी सुद्धा केली गेली. परंतु उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची भीती वर्तविली जात असल्याने या महत्त्वपूर्ण योजनेला खीळ बसते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. तसेच आता काही ठिकाणी लोटा बहादरांचे दर्शन घडत असल्याने भविष्यात पाणीटंचाईमुळे अशी परिस्थिती निर्माण होईल याचे जणू हे लोटाबहादर संकेत तर देत नसतील ना? अशी चर्चा काही ठिकाणी ऐकायला मिळत आहे.स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत स्वच्छतेकडून समृद्धीकडे असा नारा देत जिल्ह्यातील अनेक गावे हागणदारीमुक्त करण्यात आली. त्या अनुषंगाने संबंधित ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाला सूचना देऊन घरोघरी शौचालय बांधकाम करणे, शासकीय अनुदान देणे, जनजागृती आदी बाबींवर खर्च करण्यात आला. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गाव पातळीवर गुडमाँर्निग पथक तयार करून हे पथक पहाटे ५ ते ८ या वेळेत उघड्यावर शौचास जाणाऱ्या व्यक्तीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत होते. त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत होते. त्यामुळे गावे हागणदारीमुक्त होण्याचा प्रशासनाने प्रयोग केला. परंतु सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून जिल्ह्यातील बहुतेक गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. काही ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ ग्रामस्थांवर येत असते. त्यात शौचालयासाठी मुबलक पाणी आणायचे कोठून असा गहन प्रश्न नागरिकांसमोर सध्या उभा राहत आहेत. येणाऱ्या काळात पाणीटंचाई हेच एकमेव कारण स्वच्छ भारत अभियानाला अडथळा बनण्याच्या मार्गावर दिसत आहे. ही समस्या जर दूर करायची असेल तर आताच नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करून शासनाच्या या योजनेला यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा, असे जाणकारातून बोलले जात आहे.

टॅग्स :Governmentसरकारwater shortageपाणीकपात