शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

पाणी बचत ही लोकचळवळ बनावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:16 IST

पिंपळगाव बसवंत : सन १९४२ ते १९५२ या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला केंद्रीय जल आयोग स्थापित करून सोननदी, हिराकुंड, दामोदर विकास खोरे स्थापितकडून अवघ्या तीन वर्षांत भारतीय वीज मंडळ, पाटबंधारे, नोकनायन, मत्स्यव्यवसाय यासह कृषी धोरणाची पायाभरणी केली असून, आजच्या राज्यकर्त्यांनी जल, जंगल, जमीन संवर्धन कामात नियोजन व धोरणांचाच दुष्काळ निर्माण केला आहे.

ठळक मुद्देअशोक सोनवणे : पिंपळगाव बसवंत येथे जलशाहिरी परिषद उत्साहात

पिंपळगाव बसवंत येथे लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान आयोजित जलशाहिरी परिषद उद्घाटन करताना प्रा. अशोक सोनवणे, प्रा. दिनेश अनारसे, प्रा. शरद शेजवळ, महेंद्र गायकवाड, नुमान शेख आदी.

 

 

पिंपळगाव बसवंत : सन १९४२ ते १९५२ या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला केंद्रीय जल आयोग स्थापित करून सोननदी, हिराकुंड, दामोदर विकास खोरे स्थापितकडून अवघ्या तीन वर्षांत भारतीय वीज मंडळ, पाटबंधारे, नोकनायन, मत्स्यव्यवसाय यासह कृषी धोरणाची पायाभरणी केली असून, आजच्या राज्यकर्त्यांनी जल, जंगल, जमीन संवर्धन कामात नियोजन व धोरणांचाच दुष्काळ निर्माण केला आहे.पाणी संकटावर मात करण्यासाठी पाणी बचत-नियोजन ही लोकचळवळ बनावी, असे मत प्रा. अशोक सोनवणे यांनी लोकशाहीर दिनानिमित्त पाचव्या जलशाहिरी परिषदेत बोलताना व्यक्त केले. लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक व बी.पी. पाटील ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्स पिंपळगांव बसवंत यांच्या वतीने बुधवारी पाचव्या जलशाहिरी परिषदेत प्रा. सोनवणे बोलत होते.सुफीकवी नुमान शेख अध्यक्षस्थानी होते. परिषदेस प्रा. दिनेश अनारसे, प्रा. किरण आरोटे, प्रा. कावेरी देवरे, प्रा. अमोल ताजने, प्रा. पगारे, प्रा. प्रकाश भंडारे, प्रा. सचिन बिडवे उपस्थित होते.कवी सोमनाथ गायकवाड, कवी भामरे व अभिषेक गांगुर्डे यांनी आपल्या जल, जंगल, जमीन-पर्यावरण संवर्धन काव्यगीते सादर केली. प्रास्ताविक प्रा. शरद दि. शेजवळ यांनी केले. सूत्रसंचालन महेंद्र गायकवाड यांनी केले. महाकवी वामनदादा कर्डक यांनी सामाजिक प्रबोधन चळवळीत अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावली असून, बुद्ध आंबेडकरवादी गीतांसोबतच त्यांनी जल जंगल जमीन पर्यावरण महिला, कष्टकरी शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार यांच्या जीवनावर लेखन केले आहे. त्यांच्या याच साहित्य शाहिरीला उजाळा देऊन त्यांचा सामाजिक न्यायाचा ध्यास असलेले विचार व दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कवी गायक लेखक साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून पाणी हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आपल्या साहित्य प्रतिभेचा हाती घेऊन आपण लोक कलेतून लोक मनोरंजन व लोक मनोरंजनातून लोक जागृती करीत राहावे याकरिता कर्डक यांचा स्मृतिदिन ‘लोकशाहीर’ म्हणून साजरा करण्यात आला.