शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कसमादेवासीयांचा पाणीप्रश्न मिटला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 00:28 IST

कळवण : कसमादे पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याची सोडवणूक करण्यासाठी चणकापूर व पुनंद प्रकल्पातून व त्या अंतर्गत कालव्याद्वारे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिल्यामुळे पाणी आवर्तनाच्या माध्यमातून कसमादे पट्ट्यातील गिरणा व पुनंद काठाला दिलासा मिळाला आहे.

कळवण : कसमादे पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याची सोडवणूक करण्यासाठी चणकापूर व पुनंद प्रकल्पातून व त्या अंतर्गत कालव्याद्वारे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिल्यामुळे पाणी आवर्तनाच्या माध्यमातून कसमादे पट्ट्यातील गिरणा व पुनंद काठाला दिलासा मिळाला आहे.चणकापूर व पुनंद धरणात शिल्लक असलेल्या साठ्यापैकी ७५० दशलक्ष घनफूट पाणी बुधवारपासून २०० ते १२०० क्युसेसने गिरणा व पुनंद नदीसोबत चणकापूर उजवा कालव्यात विसर्ग करण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सहायक अभियंता वैशाली ठाकरे व पुनंदचे उपअभियंता विजय टिळे यांनी दिली.चणकापूर व पुनंद धरणातून गिरणा व पुनंद नदीपत्रात व त्या अंतर्गत कालव्यांना पाणी सोडण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेकडून होत असल्यामुळे आमदार नितीन पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी साठा असल्याचे निदर्शनास आणून देत पाणी सोडण्याची मागणी केली होती.कसमादे पट्ट्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी चणकापूर व पुनंद प्रकल्पातून कळवण, देवळा, सटाणा तालुक्यातील व गिरणा व पुनंद नदीकाठावरील गावे व मालेगाव महानगरपालिका, सटाणा नगर परिषद, कळवण नगरपंचायत व इतर पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी बिगर सिंचन आवर्तनासाठी देणे शक्य असल्याने पाणी सोडण्यात आले आहे.  चणकापूर व पुनंद धरणातून गिरणा आणि पुनंद नदीला, चणकापूर उजवा कालव्याला एकाच वेळी सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे. चणकापूरच्या पाण्याने मालेगावसाठी असलेल्या तळवाडे तलाव भरण्याचा खास उद्देश असून, या अंतर्गत कसमादेसह इतर गावांनाही फायदा होणार आहे. दोन्ही धरणात असलेला शिल्लक पाणीसाठा आगामी काळात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास वापरण्यात येणार असून, या नियोजनामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याचे संकेत मिळत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक