शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बरड्याच्या वाडीचा पाणीप्रश्न तूर्तास मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 23:41 IST

त्र्यंबकेश्वर तालुक्यात टाके देवगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बरड्याची वाडी भुकेबरोबरच तहानेनेदेखील व्याकूळ झाल्याचे वृत्त लोकमतमध्ये झळकताच गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी ग्रामपंचायत निधीतून तातडीने टँकर सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बरड्याच्या वाडीला टँकरने पाणी- पुरवठा सुरू झाला असून, तुर्तास पाण्याची समस्या मिटली आहे.

ठळक मुद्देदखल : ग्रामपंचायत निधीतून टँकर सुरु

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तालुक्यात टाके देवगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बरड्याची वाडी भुकेबरोबरच तहानेनेदेखील व्याकूळ झाल्याचे वृत्त लोकमतमध्ये झळकताच गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी ग्रामपंचायत निधीतून तातडीने टँकर सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बरड्याच्या वाडीला टँकरने पाणी- पुरवठा सुरू झाला असून, तुर्तास पाण्याची समस्या मिटली आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजुरी आल्याशिवाय अधिकृत टँकर सुरू होऊ शकत नाही आणि ग्रामपंचायत स्वनिधीतून दररोज टँकर देऊ शकणार नाही, अशी स्थिती आहे. गावात पाण्यासारखी ज्वलंत समस्या असताना ग्रामसेवकदेखील १५ दिवस रजेवर असल्याचे समजते. या गावासाठी २५ लाख रुपये खर्चाची ग्रामीण पाणीपुरवठा योजना शासनाकडेच मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.वावी हर्ष येथील उपसा जलसिंचन सहकारी संस्थेच्या मालकीच्या विहिरीला स्रोत बनवून या विहिरीला योजना केल्यास त्या विहिरीतून बरड्याच्या वाडीला बाराही महिने २४ तास पाणीपुरवठा होऊ शकेल, असा एक मतप्रवाह आहे.ही विहीर बरड्याच्या वाडीपासून तीन किमी अंतरावर असल्याने विहीर गृहीत धरूनच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने योजना तयार करून शासनाकडे पाठविली आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकWaterपाणी