शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे स्रोत शुद्धिकरणाचे काम युद्धपातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:12 IST

सिन्नर : ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी त्यांना शुद्ध पाणी देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार सिन्नर तालुक्यातील जलकुंभ, पाण्याच्या टाक्या व पाण्याचे स्रोत शुद्धिकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी दिली.

ठळक मुद्देसिन्नरला पालिकेतर्फे अभियान पावसाळ्यात साथीचे आजार रोखण्यासाठी उपाययोजना

सिन्नर : ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी त्यांना शुद्ध पाणी देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार सिन्नर तालुक्यातील जलकुंभ, पाण्याच्या टाक्या व पाण्याचे स्रोत शुद्धिकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी दिली.पावसाळ्यात ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले होते. त्यानुसार बुधवारपासून (दि. २०) तालुक्यातील ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा या ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ टाकी स्वच्छता व हातपंप शुद्धिकरण अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पाण्याचा पुरवठा आणि जलजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने हे अभियान राबविण्यात येत आहे. यामुळे गावाला शुद्ध पिण्याचा पाण्याचा पुरवठा मिळण्यास मदत होईल.दरम्यान, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे यांनी पावसाळ्यात नियमित शुद्धिकरण करून जनतेस निर्जंतुक पाणीपुरवठा करण्याबाबत तालुका व ग्रामपंचायत यंत्रणेला निर्देश दिले असून, पावसाळ्यात एकही गावात पिण्याच्या पाण्यामुळे साथ उद्भवू नये यासाठी उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.यावेळी गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, शाखा अभियंता, सरपंच, जिल्हा पाणी गुणवता निरीक्षक, विस्तार अधिकारी, उपविभागीय पाणी गुणवत्ता सल्लागार, गटसमन्वयक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्य सहाय्यक, जल सुरक्षारक्षक व ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.४५ पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छताबुधवारी तालुक्यातील दातली, चिंचोली, मोह, खडांगळी, सोनांबे, मुसळगाव, कारवाडी, देशवंडी, गुरेवाडी, नांदूरशिंगोटे, रामनगर, वडझिरे, भरतपूर, खंबाळे आदींसह ४० ते ४५ ग्रामपंचायतींमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. ज्या स्रोताचे पाणी पिण्यास वापरले जाते त्याचे तसेच हातपंपाचे शुद्धिकरण करण्यात आले. त्यावर शुद्धिकरण करणाची तारीख नमूद करण्यात आली आहे.