शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पाणी शुद्धीकरण अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 01:55 IST

वसाळ्यात उद्भवणाऱ्या जलजन्य आजारांवर नियंत्रण आणि प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात पाणी शुद्धीकरण अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत सर्वत्र स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यास मदत होणार असून, आजारापासून मुक्ततादेखील मिळणार आहे.

नाशिक : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या जलजन्य आजारांवर नियंत्रण आणि प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात पाणी शुद्धीकरण अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत सर्वत्र स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यास मदत होणार असून, आजारापासून मुक्ततादेखील मिळणार आहे.  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी या प्रकरणी आदेश दिले असून, जिल्ह्यात पाणी तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारपासूनच ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा येथे पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या स्वच्छता व हातपंप शुद्धीकरण अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली.निफाड तालुक्यातील चाटोरी, सोनगाव, चांदोरी, शिवडी, विंचूर, रानवड, दारणा सांगवी, दिंडोरी-चास, औरंगपूर, ठाणगाव थडी, पाचोरे बु. टाकळी विंचूर, भुते, महाजनपूर आदी ग्रामपंचायतीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या पूर्णपणे स्वच्छ करण्यात आल्या. नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्येदेखील मोहीम राबविण्यात आली. अंगणवाडी व शाळेत वापरात येणाºया पाण्याच्या टाक्यांचीही स्वच्छता करण्यात आली. ज्या स्त्रोताचे पाणी पिण्यास वापरले जाते त्याचे तसेच हातपंपांचेही शुद्धीकरण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, जिल्हा पाणी गुणवत्ता निरीक्षक, विस्तार अधिकारी, गट समन्वयक, उपविभागीय पाणी गुणवत्ता सल्लागार, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्य सहायक, जलसुरक्षक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.  दरम्यान, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी पावसाळ्यात नियमित शुद्धीकरण करून जनतेस निर्जंतुक पाणीपुरवठा करण्याबाबत सर्व तालुका व ग्रामस्तरीय यंत्रणेला निर्देश दिले असून, पावसाळ्यात एकाही गावात पिण्याच्या पाण्यामुळे साथ उद्भवू नये यासाठी उपाययोजना करण्याचे करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदWaterपाणी