शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

बागलाण तालुक्यात जलशुद्धिकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:39 IST

सटाणा : ग्रामपंचायत ,अंगणवाडी व शाळांमधील पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ ,टाक्या व हातपंप शुद्धीकरण अभियानास बागलाण तालुक्यात प्रारंभ करण्यात आला आहे.पिहल्या टप्प्यात ८१ गावांच्या टाक्यांची स्वच्छता पूर्ण झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व सुरिक्षत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे.

ठळक मुद्देनिर्जंतुकीकरण : प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्र येथे पाणी साठविण्याच्या टाक्या, ड्रम, फिल्टर यांची स्वच्छता

सटाणा : ग्रामपंचायत ,अंगणवाडी व शाळांमधील पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ ,टाक्या व हातपंप शुद्धीकरण अभियानास बागलाण तालुक्यात प्रारंभ करण्यात आला आहे.पिहल्या टप्प्यात ८१ गावांच्या टाक्यांची स्वच्छता पूर्ण झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व सुरिक्षत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे.पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी जिल्हापरिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गीते यांनी येत्या 18 जून ते 6 जुलै पर्यंत पत्येक गावातील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याचे निर्देश दिले आहेत.त्यानुसार बागलाण तालुक्यात शुद्धीकरण अभियान राबविण्यात येत आहे.तालुक्यातील ताहाराबाद ,द्याने ,सोमपूर ,जायखेडा ,आसखेडा ,ब्राम्हणपाडे ,मुंजवाड ,चौंधाणे, करंजाड ,निताणे, केरसाणे, दसाणे, पिंगळवाडे, पारनेर .आराई ,बुंधाटे, पठावे दिगर, मुंगसे, सारदे,जोरण ,डांगसौदाणे, कंधाणे, दिहंदुले ,निकवेल, तळवाडे दिगर, तरसाळी ,औंदाणे, जाखोड, मोरकुरे आदी गावांमध्ये स्वच्छता व जलस्रोत यांचे शुद्धीकरण अभियान राबविण्यात आले. या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या पूर्णपणे स्वच्छ करण्यात आल्या.तसेच प्राथमिक शाळा ,अंगणवाडी केंद्र येथे पिण्याचे पाणी साठविण्याच्या टाक्या ,ड्रम ,फिल्टर यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.गावातील पाण्याच्या स्रोतांचे शुद्धीकरण ,हातपंप ,पाण्याचे जलकुंभ व टंकरने पाणीपुरवठा होत असलेल्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.जिल्ह्यात सर्वत्र ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.ज्या स्रोतांचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते .त्यांचे व हातपंपचेही शुद्धीकरण होत आहे.त्यासाठी सरपंच ,सदस्य पुढाकार घेत असून त्यांना आरोग्य विषयी माहिती आरोग्य विभागाच्या विशेष पथकाकडून दिली जात आहे.स्वच्छता विभागाचे वैभव पाटील ,उपविभागीय पाणी गुणवत्ता सल्लागार ,ग्रामविकास अधिकारी ,ग्रामसेवक ,आरोग्य सेवक ,अंगणवाडी सेविका ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. जलकुंभांसह हातपंपाचे होणार शुद्धीकरणकळवण येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या सुचनेनुसार दोन दिवस तालुक्यातील ८६ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सर्व गाव, वाड्या व वस्तीवर तसेच अंगणवाडी, तालुक्यातील २०७ प्राथमिक शाळा येथे पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या स्वच्छता व हातपंप शुद्धीकरण अभियान राबविले जाणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी डी.एम.बहिरम यांनी दिली.ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरिक्षत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मिळण्यासाठी व जलजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी डॉ. गिते यांनी असे नावीन्यपूर्ण अभियान जिल्ह्यात सुरू केले आहे. यामुळे गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्यास मदत होणार आहे.पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी पावसाळ्यात नियमति शुद्धीकरण करून जनतेस निर्जंतुक पाणीपुरवठा करण्याबाबत सर्व तालुका व ग्रामस्तरीय यंत्रणेला निर्देश दिले असून, पावसाळ्यात एकाही गावात पिण्याच्या पाण्यामुळे साथ उद्भवू नये यासाठी उपाययोजना करण्याचे करण्याचे आदेश दिले आहेत.डॉ. नरेश गिते यांच्या निर्देशानुसार सर्व ग्रामपंचायत , शाळा व अंगणवाडीतील पाण्याचे जलकुंभ व हातपंप शुद्धीकरण दोन दिवसात करण्यात येणार आहे, देखरेख साठी तालुकास्तरावरून संपर्कअधिकारी नेमण्यात आले आहे.- डी.एम.बहिरम, गटविकास अधिकारी