शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

पुणेगाव कालव्याचे पाणी केद्राईत की दरसवाडीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 17:43 IST

संघर्ष पेटण्याची चिन्हे : भुजबळांपाठोपाठ अहेरांकडून पाहणी

ठळक मुद्देपुणेगावचे पाणी केद्राई धरणात टाकण्यात यावे किंवा भाटगाव नाल्यातुन दरसवाडीला पाणी न्यावे अशा विविध सूचना यावेळी शेतकऱ्यांनी केल्या

चांदवड : मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्यातून पाणी प्रवाहित झाल्यानंतर राष्टवादी आणि भाजप यांच्यात श्रेयवाद उफाळून आलेला असतानाच चांदवड तालुक्याला वरदान ठरणाऱ्या पुणेगाव -दरसवाडी कालव्याच्या ६३ कि.मी. परसूल गावापर्यंत आलेल्या पाण्याचाही मुद्दा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या कालव्याची आमदार छगन भुजवळ व आमदार डॉ. राहुल अहेर या दोहोंनी पाहणी करुन श्रेयवादाला तोंड फोडले आहे. सदर कालव्याचे पाणी केद्राई धरणात टाकण्याला भुजबळांनी अनुकूलता दर्शविली असताना सदर पाणी दरसवाडी धरणातच टाकणे गरजेचे असल्याची भूमिका डॉ. अहेर यांनी घेतल्याने राष्टÑवादी-भाजपमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पुणेगाव-दरसवाडी कालवा व धरणाची पाहणी नुकतीच येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. देवसाने मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्याने पुणेगाव धरण भरले असून पुणेगाव दरसवाडी कालव्याद्वारे ५९/५०० कि.मी. पर्यंत पाणी पोहचले आहे. मात्र गळतीमुळे पाण्याचा विसर्ग धिम्या गतीने सुरू असल्याने कामातील दिरंगाई बद्दल भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. पुणेगावचे पाणी केद्राई धरणात टाकण्यात यावे किंवा भाटगाव नाल्यातुन दरसवाडीला पाणी न्यावे अशा विविध सूचना यावेळी शेतकऱ्यांनी केल्या. त्यावर भुजबळ यांनी केद्राई धरणात पाणी टाकण्याबाबत अनुकूलता दर्शविली.भुजबळ यांच्या पाठोपाठ चांदवड-देवळ्याचे आमदार डॉ. राहूल अहेर यांनीही परसूल शिवारात पाण्याची पाहणी केली. मागील झालेल्या चुका व कालव्यास ठिकठिकाणी असलेली गळती यामुळे या कालव्याचे पाणी शेवटपर्यंत पोहचत नव्हते. त्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकरी वंचित असल्याचे डॉ. राहुल अहेर यांनी यावेळी सांगितले. मात्र, पुणेगाव परिसरातील नागरीकांच्या जमिनी गेल्या असल्याने त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी पाणी दरसवाडी धरणातच टाकणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. भुजबळ व अहेर यांनी घेतलेल्या परस्परविरोधी भूमिकांमुळे पुणेगाव पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शेतकरी केद्राईसाठी आग्रहीदेवरगाव, दरसवाडी , उर्धुळ ,भोयेगाव येथील शेतक-यांची सदरचे पाणी परसुल मार्गे चढ असल्याने पाणी जात नाही त्यामुळे सदर पाणी केद्राई धरणात टाकून नंतर ते दरसवाडी धरणात सोडावे अशी मागणी आहे. त्यामुळे सरकार याबाबत नेमकी कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागून असणार आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळ