शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

त्र्यंबकेश्वरला दर्शन बारीसाठी वॉटर प्रूफ शामियाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 14:47 IST

त्र्यंबकेश्वर : बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या येथील त्र्यंबकराजाच्या दर्शनसाठीच्या बारीसाठी भव्य वॉटर प्रूफ शामियाना उभारण्यात आला असून श्रावण महिन्यापुर्वीच त्याचा वापर सुरु होणार असल्याने भाविकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी पुर्व दरवाजाने सोडले जाते. तथापि आतापर्यंत पुर्वगेटच्या शामियान्याचे काम पुर्ण झाले नव्हते. त्यामुळे भाविकांना उत्तर गेटने प्रवेश दिला ...

त्र्यंबकेश्वर : बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या येथील त्र्यंबकराजाच्या दर्शनसाठीच्या बारीसाठी भव्य वॉटर प्रूफ शामियाना उभारण्यात आला असून श्रावण महिन्यापुर्वीच त्याचा वापर सुरु होणार असल्याने भाविकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी पुर्व दरवाजाने सोडले जाते. तथापि आतापर्यंत पुर्वगेटच्या शामियान्याचे काम पुर्ण झाले नव्हते. त्यामुळे भाविकांना उत्तर गेटने प्रवेश दिला जात होता. पावसामुळे भाविकांची अतिशय गैरसोय होत होती. त्र्यंबकमध्ये पावसाचा मुक्काम आता वाढला आहे आणि दर्शनार्थी भाविकांची संख्या देखील वाढलेली आहे. मंदिर ट्रस्टने आतापर्यंत पुर्व गेट दर्शन बारी मंडप उभारलेला नव्हता. आता मंडपाचे काम पुर्ण झाले आहे. हा शामियाना तथा मंडप संपुर्ण वॉटरप्रुफ असुन ५० ते ६० मीटर मापाचा तयार करण्यात आला आहे. मंदिर ट्रस्टने पुर्वगेटने सद्य स्थितीला भाविकांना उत्तर दरवाजाने प्रवेश दिला जात आहे. मात्र भाविक भर पावसात उभे असतात. यामध्ये लहान मुले आणि वयोवृध्दांचा देखील मोठा भरणा असतो. मंदिर ट्रस्टवर नव्याने विश्वस्त नियुक्त झाले आहेत. नियुक्ती दरम्यान झालेल्या मुलखतीत जवळपास प्रत्येक अर्जदाराने भाविकांच्या दर्शनबारीची सुविधा निर्माण करणार असे सांगीतले होते. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने येथे २०० रु पयात थेट दर्शन सुविधा काही वर्षांपासून उपलब्ध करु न दिली आहे. दोनशे रु पये देणगी पावती घेऊन उत्तर दरवाजाने थेट दर्शनबारीत सोडले जाते.-----------------------------दर्शन बारी मंडपाचे काम पुर्ण झाले असुन या मंडपात एका वेळेस हजारो भाविक उभे राहु शकतात. दर्शन बारीत आपला नंबर येईपर्यंत दर्शनाथीच्या सोयीसाठी मोठा टीव्ही संच बसविण्यात आला आहे. वृध्द, महिला पुरु ष यांना रांगेतच बसण्यासाठी बाकडे, बाजुला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच फ्रेश होण्यासाठी महिला व पुरु षांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दी नियंत्रणासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त, देवस्थानचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.याप्रमाणे मंडप सुविधा उपलब्ध करु न देण्यात आली आहे. हा शामियाना दोन महिन्यापुरता आहे. मंडप अत्यंत आकर्षक व भक्कम उभारण्यात आला आहे. श्रावण महिन्याच्या व एरवी होणा-या संपुर्ण व्यवस्थेवर त्र्यंबकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष बोधनकर, सचिव डॉ.चेतना मानुरे केरुरे, विश्वस्त दिलीप तुंगार, प्रशांत गायधनी, संतोष कदम, पंकज भुतडा, संतोष दिघे व सौ.तृप्ती धारणे आदी लक्ष ठेउन आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक