शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

१३ लाखांच्या महसुलावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:27 IST

सटाणा : महसूल खाते एकीकडे गौणखनिज चोरी करणाºयांवर दंडात्मक कारवाई करीत असताना दुसरीकडे मात्र पकडलेली वाहने मंत्रालयातील एका फोनने सोडून देऊन एकप्रकारे गौणखनिज तस्करीलाच खतपाणी घातले जात असल्याचा प्रकार सटाणा तहसीलमध्ये उघडकीस आला आहे. वाळूच्या तीन टॅÑक्टरसह मुरूम भरलेले डंपर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता सोडून दिल्याने महसूल यंत्रणा संशयाच्या घेºयात सापडली आहे. तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्या भूमिकेमुळे साडेतेरा लाखांचा महसूल बुडाल्याचे वर्तुळात बोलले जात आहे.

ठळक मुद्देबागलाण : दंड न आकारताच सोडली गौणखनिजाची वाहने; यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात

सटाणा : महसूल खाते एकीकडे गौणखनिज चोरी करणाºयांवर दंडात्मक कारवाई करीत असताना दुसरीकडे मात्र पकडलेली वाहने मंत्रालयातील एका फोनने सोडून देऊन एकप्रकारे गौणखनिज तस्करीलाच खतपाणी घातले जात असल्याचा प्रकार सटाणा तहसीलमध्ये उघडकीस आला आहे. वाळूच्या तीन टॅÑक्टरसह मुरूम भरलेले डंपर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता सोडून दिल्याने महसूल यंत्रणा संशयाच्या घेºयात सापडली आहे. तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्या भूमिकेमुळे साडेतेरा लाखांचा महसूल बुडाल्याचे वर्तुळात बोलले जात आहे.गेल्या महिन्यात वाळू माफियांविरुद्ध महसूल व पोलीस यंत्रणेने धडक मोहीम हाती घेतली होती. मालेगाव ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे यांनी नामपूर व सटाणा शहरात रात्रीच्या सुमारास वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा केले होते. या कारवाईबरोबरच तहसील कार्यालयातील काही अधिकाºयांनीदेखील पोलिसांच्या बरोबरीने कारवाई केली होती. या कारवाई दरम्यानच महसूलच्या अधिकाºयांनी मुरूम चोरी करणारा डंपर व जेसीबीविरु द्ध कारवाई केली होती. वाळू चोरीत पकडलेल्या टॅÑक्टरला प्रत्येकी एक लाख ३० हजार रु पयांच्या दंडात्मक कारवाईबाबत नोटीस बजावल्या तर डंपरला मुरूम चोरी प्रकरणी नऊ लाख २० हजार रु पये दंड भरण्यास बजावले होते.तशा लेखी नोटिसादेखील तस्करांना बजावल्या होत्या; मात्र पंधरा दिवस तहसील आवारात पकडून ठेवलेली ही वाहने अचानक सोडून दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. गौणखनिज चोरी रोखण्यासाठी महसूलची यंत्रणा रात्रपहाट एक करून वाहने पकडत असताना दुसरीकडे मात्र हीच वाहने तहसीलदार , प्रांताधिकारी दंडात्मक कारवाई न करताच सोडून दिल्याने कनिष्ठ अधिकाºयांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. दिवसाढवळ्या होत असलेल्या गौणखनिज चोरीमुळे महसूल यंत्रणेलाच आरोपीच्या पिंजºयात बसविले जाते.अशा परिस्थितीत महसूल विभागातील कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी वाळू, मुरूम चोरी रोखण्यासाठी जीव धोक्यात घालून वाहने पकडतात. गेल्या अनेक दिवसांपासून मुरूम चोरी करणारे डंपर, जेसीबीदेखील पकडले. संबंधित माफियांना दंडात्मक कारवाईसाठी नोटिसादेखील बजावण्यात आल्या. नोटीस बजावल्यानंतर कारवाई टाळण्यासाठी काही पुढाºयांनी मांडवली करण्याचाही प्रयत्न केला; परंतु यश आले नाही.दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी गौण खनिज चोरीसंदर्भात अधिकारी आणि वाळूचोर यांच्यात लागेबांधे असल्याचा पुनरुच्चार केला होता. त्यांनतर हे प्रकरण उघडकीस आल्याने चर्चांना ऊत आला आहे.मंत्रालयातून फोन कुणाचा ?पंधरा दिवसांनी अचानक तहसील आवारातून पकडलेली वाहने गायब झाली. या प्रकारामुळे काही वाळू माफियांनी अधिकाºयांना धारेवर धरताच एका वरिष्ठ अधिकाºयाने मंत्रालयातून फोन आल्यामुळे वाहने सोडल्याचा गौप्यस्फोट केला. याबाबत गुन्हा एक न्याय मात्र दोघांना अलग अलग. ज्या कंपनीचे डंपर पकडले त्या कंपनीत एक माजी मंत्री पार्टनर असल्याचा खुलासादेखील करण्यात आला; मात्र मंत्रालयातून कोणाचा फोन होता की कोणी डमी फोन केला याबाबत उलटसुलट चर्चा असून, मंत्रालयातून जनहिताची कामे अपेक्षित असताना या फोनमुळे आता खनिज तस्करीलाच खतपाणी घातले जात आहे. या फोनमुळे तब्बल साडेतेरा लाखांच्या महसुलावर पाणी सोडले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा