शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दुतोंड्याच्या गुडघ्याला पाणी : अंबोली परिसरात जोरदार पाऊस २ हजार आठशे क्यूसेकचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:29 IST

शहरात जरी पावसाचा जोर ओसरला असला तरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाने मंगळवारी जोरदार हजेरी लावली. यामुळे गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने धरणात पाण्याची आवक सुरूच होती. त्यामुळे रात्री आठ वाजता गंगापूर धरणातून दोन हजार ८०० क्यूसेक इतका विसर्ग करण्यात आला.

नाशिक : शहरात जरी पावसाचा जोर ओसरला असला तरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाने मंगळवारी जोरदार हजेरी लावली. यामुळे गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने धरणात पाण्याची आवक सुरूच होती. त्यामुळे रात्री आठ वाजता गंगापूर धरणातून दोन हजार ८०० क्यूसेक इतका विसर्ग करण्यात आला.शहरात रविवारी व सोमवारी जोरदार पाऊस झाला; मात्र मंगळवारी जोर ओसरला सकाळी साडेआठ वाजेपासून रात्री साडेआठपर्यंत ६.६ मि.मी. इतका पाऊस झाल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राने केली आहे. संध्याकाळी साडेपाच ते साडेआठच्या दरम्यान ४.९ मि.मी. पाऊस झाला. दुपारनंतर पावसाला शहरासह उपनगरांमध्ये सुरुवात झाली होती; मात्र पावसाचा जोर नसल्यामुळे शहरात कमी पाऊस झाला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गंगापूरच्या समूहाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या अंबोली गावच्या परिसरात सर्वाधिक ६० मि.मी. इतका पाऊस पडला. तसेच हरसूल, वाघेरा, चिंचवड परिसरातही दुपारी जोरदार पाऊस झाला. यामुळे कश्यपी धरणाच्या पातळीतही वाढ झाली होती. कश्यपीच्या पाणलोट क्षेत्रात ३६ मि.मी. इतका पाऊस पडला. यामुळे काश्यपीमधून ६४६ तर आळंदीमधून २४३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग गंगापूरमध्ये करण्यात आल्याने गंगापूर धरणात पाण्याची आवक वाढली होती. यामुळे रात्री विसर्ग वाढविण्यात आला. गोदापात्रात गंगापूरमधून २८३२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आले होते. रात्री आठ वाजेनंतर होळकर पुलाखालून ३५९० क्यूसेक पाण्याचा विसर्ग पुढे सुरू होता.