शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 22:48 IST

मनमाड : पावसाने जोरदार हजेरी लावून सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने नद्यांना महापूर आला असला तरी गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईच्या दृष्टचक्रात सापडलेल्या मनमाड परिसरात मात्र केवळ पावसाची बुरबूर सुरू आहे. परिसरात अद्यापही जोरदार पावसाचे आगमन झाले नसल्याने भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. परिणामी मनमाडकरांना १२ ते १४ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याने ऐन पावसाळ्यातही मनमाडकर तहाणलेलेच आहेत.

ठळक मुद्दे येत्या काही दिवसात पाणीपुरवठ्याच्या दिवसांमध्ये कपात करण्याचे नियोजन सुरू

 

मनमाडकर तहानलेलेच । ऐन पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती

गिरीश जोशी

मनमाड : पावसाने जोरदार हजेरी लावून सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने नद्यांना महापूर आला असला तरी गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईच्या दृष्टचक्रात सापडलेल्या मनमाड परिसरात मात्र केवळ पावसाची बुरबूर सुरू आहे. परिसरात अद्यापही जोरदार पावसाचे आगमन झाले नसल्याने भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. परिणामी मनमाडकरांना १२ ते १४ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याने ऐन पावसाळ्यातही मनमाडकर तहाणलेलेच आहेत.सध्या जिल्ह्यासह सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. नदीनाल्यांना महापूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाअभावी तीव्र पाणीटंचाई आणि दुष्काळामुळे होरपळलेल्या जनतेला आणि बळीराजाला यावर्षी दिलासा मिळणार अशी आशा वाटत असतानाच पावसाने पाठ फिरवल्याने सर्वांचाच भ्रमनिरास झाला. मनमाड शहराची पाणीटंचाईच्या संकटातून अजूनही सुटका झालेली नाही. आजही शहरातील अनेक भागांना १२ ते १४ दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील कूपनलिका व विहिरी कोरड्या असल्याने पाण्याची शोधाशोध करावी लागत आहे. मनमाड शहरातील पाणीटंचाईचे भोग अजूनही संपलेले नाहीत. तालुक्यात काही भागात थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला असला तरी शहरासह पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाच्या पानलोटक्षेत्रामध्ये पाऊस झालाच नाही. गेल्या दोन आठवड्यांपासून सर्वत्र पावसाने हाहाकार उडाला असला तरी मनमाड परिसरात मात्र पावसाची बुुरबूर सुरू आहे. परिणामी पडत्या पावसातही मनमाडकरांच्या नशिबी पाणीटंचाईचा फेरा आहे तसाच कायम आहे. पावसाअभावी विहिीरींना अद्याप पाणी आलेले नसल्याने परिसरातील शेतकरीसुद्धा हवालदिल झाला आहे. परिसर सध्या जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.पालखेड धरणातून मुबलक प्रमाणात मिळणाºया पूरपाण्यामुळे पालिकेचा पाटोदा साठवणूक तलाव भरून घेण्यात आला आहे. मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाºया वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने या धरणात अल्पपाणी साठा जमा झाला असला तरी पाटोदा साठवण तलावातून चार पंपांच्या साहाय्याने पाणी उचलून वागदर्डी धरणात साठवण्यात येत आहे. वागदर्डीमध्ये बºयापैकी पाणीसाठा झाल्यानंतर पाणीपुरवठ्याच्या नियोजनात बदल करून दहा ते बारा दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. यावर्षी सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असला तरी मनमाडकरांवर मात्र पावसाअभावी पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे.मनमाड परिसरात पावसाने दडी मारल्याने पाटोदा साठवण तलावातून वागदर्डी धरणात पाणी घेण्यात येत आहे. येत्या काही दिवसात पाणीपुरवठ्याच्या दिवसांमध्ये कपात करण्याचे नियोजन सुरू आहे.- पद्मावती धात्रक,नगराध्यक्ष, मनमाड