शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

खोकरतळे अन‌् एकदेरे गावात जलोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 16:30 IST

पेठ : तालुक्यातील खोकरतळे आणि एकदरे या दोन गावांत रविवारी जलोत्सव साजरा झाला. सोशल नेटवर्किंग फोरम संस्थेच्या जलाभियानांतर्गत पूर्णत्वास गेलेल्या पाणीपुरवठा आणि जलशुद्धीकरण योजनांचे लोकार्पण राज्यसभेचे खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामस्थांनी डोक्यावर हंडे घेत, सर्व पाहुण्यांचे अनोखे स्वागत केले.

ठळक मुद्देलोकार्पण : दोन गावांतील लोकांच्या दारात पाणी

पेठ : तालुक्यातील खोकरतळे आणि एकदरे या दोन गावांत रविवारी जलोत्सव साजरा झाला. सोशल नेटवर्किंग फोरम संस्थेच्या जलाभियानांतर्गत पूर्णत्वास गेलेल्या पाणीपुरवठा आणि जलशुद्धीकरण योजनांचे लोकार्पण राज्यसभेचे खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामस्थांनी डोक्यावर हंडे घेत, सर्व पाहुण्यांचे अनोखे स्वागत केले.खोकरतळे येथील महिलांना दीड-दोन किलोमीटरवरून पाणी आणावे लागत होते. त्यामुळे जलपुरवठा योजनेद्वारे गावात पाणी आणून टाकी बांधण्यात आली. एकदरे गावात दूषित पाण्याची समस्या होती. त्या ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प उभा करून ही समस्या सोडविण्यात आली.लोकार्पण कार्यक्रमासाठी जि.प. सदस्य भास्कर गावीत, सभापती विलास अलबाड, सोशल नेटवर्किंग फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, डॉ.जयदीप निकम, प्रशांत बच्छाव, डॉ.अमोल अन्नदाते, हर्षल विभांडीक, गंधार विभाडीक, तुळशीराम वाघमारे, संजय वाघ, पुंडलिक महाले, महेश टोपले, त्र्यंबक कामडी, रघूनाथ चौधरी, रामदास भोये, संकेत नेवकर, रमेश गालट, सुरेश पवार, रमेश दरोडे, सरपंच चंद्रभागा मोंढे, तुकाराम सापटे, मनोहर मोंढे, निवृत्ती सापटे, पद्माकर कामडी, संदिप बत्तासे, दिलीप चौधरी, हरिदास गडदे, विजय भरसट, राहुल गाडगीळ, ग्रामसेवक उज्ज्वला वरपे, देविदास धूम, भूषण लोहार, चंद्रकांत जाधव, एन.व्ही. सोनवणे, जगन्नाथ गवळी, व्यंकट कदम, शाखा अभियंता जे.पी. जाधव आदींसह खोकरतळे व एकदरेचे ग्रामस्थ उपस्थितीत होते.दोन्ही गावांतील लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद अनुभवताना समाधान वाटले. आदिवासी बांधवांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या समाधानातच सारे काही मिळाले.- डॉ. विनय सहस्त्रबुद्धे.खोकरतळे योजनेविषयी ...पेठ पासून ८ किलोमीटरवर वसलेल्या खोकरतळ्यात इतर अनेक गावांसारखीच पाण्याची समस्या होती. २००६ साली एका योजनेंतर्गत डोंगराखाली असलेल्या जागेवरून पाइपलाइन केली गेली. हे पाणी गावापासून दिड किलोमीटर अंतरावरील कोरड्या विहिरीत टाकले गेले. तेंव्हापासून गावातील महिलांना दररोज इतके अंतर पायपीट करून विहिरीत टाकलेले पाणी डोक्यावरून आणावे लागत होते. आता हे पाणी गावापर्यंत आले आहे.एकदरे योजनेविषयी...शासकीय योजनेतून एकदरे या गावी पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास गेली आहे. मात्र या गावात दूषित पाणी पुरवठ्याची मोठी समस्या होती. हे पाणी पिल्याने साथीच्या आजारांचे प्रमाणही खूप होते. यावर उपाय म्हणून एकदरे येथे अद्ययावत जलशुद्धीकरण यंत्रणा बसवण्यात आली. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwater shortageपाणीकपात