शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

धरणांमधून पाण्याचा विसर्ग

By admin | Updated: November 2, 2015 22:56 IST

सर्वपक्षीय नेत्यांचा विरोध : दारणा, मुकणे, कडवा व भावलीमधून चार हजार क्यूसेस

घोटी : इगतपुरी तालुका धरणांच्या पाणीप्रश्नी सोमवारी तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेतली. रविवारी रात्री दहा वाजेपासून दारणा धरणातून पाण्याच विसर्ग सुरू केला होता. त्यामध्ये रात्री दहाच्या दरम्यान दारणा धरणातून दोन हजार क्युसेस पाणी सोडले होते तर सोमवारी सकाळी दहा वाजता तीन हजार क्युसेस व त्यानंतर अकरा वाजता चार हजार क्युसेस पाणी पोलिसांच्या चोख बंदोबस्तात सोडण्यात आले होते.दरम्यान, सोमवारी सकाळपासूनच सर्वच राजकीय पक्षांनी आपला ताफा दारणा धरणाकडे वळविला होता. यात प्रामुख्याने काँग्रेसच आमदार निर्मला गावित, विधानसभा अध्यक्ष भास्कर गुंजाळ, जिल्हा परिेषद सदस्य तथा नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अँड. संदीप गुळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गोरख बोडके यांनी सर्वप्रथम दरणाचे मुख्य अभियंता मिसाळ यांच्याशी चर्चा केली तसेच सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, कुलदीप चौधरी यांनी भेट देऊन आंदोलनाची दिशा ठरवली. मनसेचे उपजिल्हाप्रमुख रतनकुमार इचम यांनीदेखील यावेळी दारणा धरणावर भेट दिली. इगतपुरी तालुका भाजपा शिष्टमंडळानेदेखील पाण्याचा होत असलेला विसर्ग बंद करण्यासाठी प्रांताधिकारी बाळासाहेब वाघचौरे यांना निवेदन दिले. यावेळी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, भाजप नेते भाऊसाहेब धोंगडे, कैलास चौधरी हे उपस्थित होते.दरम्यान यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने जरी पाणी सोडण्याचे केवळ आदेश जरी दिले असले तरी प्रत्यक्ष किती सोडावे हे न्यायालयाने म्हटलेले नसल्याने जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा याबाबत अंतिम आदेश येत नाही तोपर्यंत प्रशासनाने पाणी बंद करावे, अशी मागणी सिन्नरचे आ मदार राजाभाऊ वाजे यांनी दारणा धरणावर केली. काल मध्यरात्री दारणा धरणातून ४ हजार क्यूसेस, मुकणे धरणातून १ हजार क्यूसेस तर कडवा धरणातून ३ हजार क्यूसेस पाणी जिल्हाधिका-यांच्या आदेशाने सोडण्यात आले होते. सकाळी सोडलेल्या पाण्यास तालुक्यातून झालेला प्रखर विरोध बघता दारणा धरणातून २ हजार क्यूसेसने पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला होता, मात्र दुपारनंतर पुन्हा विसर्ग पूर्ववत करण्यात आला. सकाळ पासूनच दारणा, मुकणे या धरणांवर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे तसेच सत्ताधारी भाजपा आदी पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह शेतक-यांनी पाण्याच्या आवर्तनास विरोध करण्यासाठी एकच गर्दी केली होती. या विरुध्द सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे जि प सदस्य गुळवे,बोडके यांनी सांगितले. त्यानंतर सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, तालुकाप्रमुख भगवान आडोळे, शेतकरी नेते पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतक-यांचा ताफा दारणा धरणावर पाण्यास विरोध करण्यासाठी जमा वह्यायला सुरु वात झाली तशी प्रशासनाची धावपळ सुरु झाली. त्यानंतर आ राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली जमलेल्या शेतक-यांची बैठक झाली. या बैठकीत तालुक्यातील धरणांतुन जायकवाडीला सोडलेल्या पाण्यास प्रचंड विरोध करण्यात आला. अगोदर हक्काचे पाणी आरक्षित करून धरणांत ठेवा मगच उरलेल्या पाण्याचा इतरत्र विचार करावा अशी मागणी शेतकरी नेते पांडुरंग शिंदे यांनी केली. यावेळी माजी आ पांडुरंग गांगड, रतन जाधव, वसंतराव मुसळे, केरू देवकर, दत्तू पासलकर आदिंसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे आणि तहसीलदार महेंद्र पवार यांना नवेदन देण्यात आले. यावेळी प्रांतअधिकारी बाळासाहेब वाघचौरे यांनी हायकोर्टाची भूमिका स्पष्ट केली. या जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस उपअधीक्षक सी. देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, घोटीचे सहायक पालीस नि रीक्षकसुरेश मनोरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)