शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

दारणातून जायकवाडीसाठी पाणी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 13:07 IST

घोटी : दारणा धरण समूहातून मराठवाड्यातील जायकवाडीसाठी गुरूवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात पाण्याचा विसर्ग सुरू केला. गुरूवारी सकाळी नऊ वाजून ...

घोटी : दारणा धरण समूहातून मराठवाड्यातील जायकवाडीसाठी गुरूवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात पाण्याचा विसर्ग सुरू केला. गुरूवारी सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी दारणा धरणाचे दोन दरवाजे उघडून तीन हजार क्यूसेसने पाणी सोडण्यात आले.दरम्यान पाणी मार्गात असलेल्या गावांचा वीजपुरवठा खंडित केल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. इगतपुरी तालुक्यातील दारणा धरण समूहातून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या हालचाली गतिमान झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्वपक्षियांनी विरोध दर्शविला होता.दारणा धरण सुमुहात येणाºया भाम, भावली आणि वाकी खापरी धरणातून तीन दिवसापूर्वी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.हे पाण्याचा दारणा धरणात साठा झाल्यानंतर हे पाणी दारणा धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात आले. गुरूवारी सकाळपासूनच या धरणावर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.सकाळी साडेनऊ वाजता प्रांताधिकारी राहुल पाटील,पोलीस उपअधीक्षक उत्तम कडलक,शाखा अभियंता सुहास पाटील यांच्या उपस्थितीत धरणाचे दोन दरवाजे उघडून तीन हजार क्यूसेस ने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.त्यानंतर दुपारी अकरा वाजता हा विसर्ग वाढवून पाच हजार ६०० करण्यात आला.तर दुपारी बारा वाजता धरणाचे सहा ही दरवाजे उघडून देत दहा हजार क्यूसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.------------------------------खंडित वीजपुरवठयामुळे शेतकरी आक्रमकदारणातून पाणी सोडण्यापूर्वी प्रशासनाने खबरदारी घेत कालव्यालगतच्या गावाचा वीजपुरवठा खंडित केला.यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ संतप्त झाले असून, हा वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक