शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

नाशिकच्या धरणांमध्ये जेमतेम पाणी

By admin | Updated: June 10, 2017 02:10 IST

नाशिक : यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर व समाधानकारक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 ंलोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर व समाधानकारक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी, नाशिक जिल्ह्णातील धरणांमध्ये जेमतेम पाणी शिल्लक राहिल्याने हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मान्सून बरसला नाही तर गंभीर संकट निर्माण होण्याची भीती प्रशासनाला वाटू लागली आहे. नाशिक जिल्ह्णात मोठी धरणे सात, तर मध्यम धरणांची संख्या १७ असल्याने पाणी साठवणुकीच्या एकूण २४ प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षी सरासरी १०२ टक्के पाऊस झाल्याने आॅक्टोबर अखेर ९२ टक्के पाणीसाठा झाला होता, त्यामुळे पाणीटंचाईचे सावट दूर झाले. धरणांच्या पाण्यावर विविध प्रकारचे आरक्षण असल्याने डिसेंबरपासून आवर्तने सुरू करण्यात आली, त्यात विशेष करून नाशिक जिल्ह्णातून मराठवाडा, जळगाव, नगर जिल्ह्णासाठी पाणी सोडण्यात आले. धरणांतील शिल्लक पाणी जुलै अखेर पिण्यासाठी राखून ठेवण्यात आले मात्र मार्च महिन्यांपासून उन्हाचा तडाखा वाढल्याने धरणांच्या पाण्याची पातळी झपाट्याने खालावली शिवाय सिंचन व बिगर सिंचनासाठी वेळोवेळी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने धरणातील पाण्याचा वापरही वाढला. जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्णातील धरणांमध्ये सरासरी बारा टक्के इतकाच साठा शिल्लक आहे. त्यातही नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २३ टक्के इतका समाधानकारक साठा असला तरी, अन्य अकरा धरणांनी तळ गाठला. अन्य धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा पाहता जेमतेम १२ टक्के पाणी सध्या शिल्लक असून, पाण्याची मागणी व उपलब्ध साठ्याचा विचार करता पाऊस वेळेवर बरसण्याची प्रतीक्षा आहे.यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाल्याचा दावा हवामान खात्याने केला असून, गत वर्षीच्या तुलनेत तो सरासरी बरसणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्णात ३ जून रोजी सर्वत्र मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावून आशादायी चित्र निर्माण केले असले तरी, मृग नक्षत्राचे आगमन होऊन तीन दिवसांचा कालावधी उलटूनही पावसाची हजेरी लागलेली नाही. जिल्ह्णातील ग्रामीण भागातील टंचाईग्रस्त गावांमध्ये ७५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टॅँकर भरण्यासाठी वापरले जाणारे पाण्याचे स्त्रोतही आटू लागले आहेत.