शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
3
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
4
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
5
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
6
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
7
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
8
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
9
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
10
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
11
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
12
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
13
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
14
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
15
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
16
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
17
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
18
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
19
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला
20
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)

आडवाडीत लोकसहभागातून केले जलसंवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 00:15 IST

आडवाडी येथे युवामित्रच्या सहकार्यातून ग्रामविकास समिती व ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने गावातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या बंधाऱ्यातील १० हजार २७५ घनमीटर गाळ उपसण्यात आला. या कामामुळे बंधाºयातील जलसाठा १.०२८ कोटी लिटरने वाढणार असल्याने येथील पिण्याच्या तसेच सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

ठळक मुद्देयुवामित्रचे सहकार्य : तीन वाड्यांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लागला मार्गी

सिन्नर : तालुक्यातील आडवाडी येथे युवामित्रच्या सहकार्यातून ग्रामविकास समिती व ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने गावातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या बंधाऱ्यातील १० हजार २७५ घनमीटर गाळ उपसण्यात आला. या कामामुळे बंधाºयातील जलसाठा १.०२८ कोटी लिटरने वाढणार असल्याने येथील पिण्याच्या तसेच सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.आडवाडी गावातील तीन वाड्यांमध्ये १९१ कुटुंबे वास्तव्यास आहेत. तीनही वाड्यांना प्रत्येकी एक एक पाझर तलाव आहे. या पाझर तलावातही गाळ व दगड, गोटे साचले होते त्यामुळे बंधाºयाची पाणी साठवणक्षमता कमी झाली होती.शेतकरी डोंगळे टाकून पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर करीत होते. युवामित्र गावात राबवत असलेल्या देवनदी पुनर्जीवन कार्यक्र मांतर्गत गावात अडूआई माता ग्रामविकास समिती तयार करण्यात आली आहे.या समितीच्या मासिक बैठकीमध्ये सदस्यांकडून बंधाºयातील गाळ उपसा व गळतीचा प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा केली. गावकऱ्यांच्या माध्यमातून बंधाºयातील गाळ वाहून नेणे व भिंतीच्या पिचिंगसाठी १ लाख २० हजार रु पयांचा निधी जमा केला व युवामित्रने दि नेचर कॉन्झर्वन्सी इंडिया या संस्थेच्या मदतीने पोकलॅन मशीन व डिझेल उपलब्ध करून दिले. लोकसहभागातून झालेल्या या जलसंवर्धनामुळे गावातील तीनही वाड्यांतील ११९५ लोक व १२५० जनावरांचा पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होण्यास मदत होईल तसेच १५० एकरवरील भात पिकाला पाणी देता येईल. तसेच बंधाºयात केला जाणारा मासेमारी व्यवसाय लिलाव पद्धतीने दिल्याने त्याचा अतिरिक्त महसूल ग्रामपंचायतीला मिळेल. त्याचबरोबर गावाच्या खालच्या वाडीत ५ हेक्टर क्षेत्रावर सलग समतल चरचे काम सुरू आहे. त्याच्या माध्यमातून डोंगरउतारावरून वाहून जाणाºया मातीची धूप थांबेल व त्यावर वृृक्षारोपणातून वनराई फुलवण्याचा गावकºयांचा मानस आहे.मे महिन्यात ग्रामस्थ व युवामित्र प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ करण्यात आला. बंधाºयात १६ दिवस पोकलॅन मशीनने गाळ उपसा केला. काढलेला गाळ २० शेतकºयांनी स्वखर्चाने ट्रॅक्टर व डंपरच्या साहाय्याने खडकाळ जमिनीवर टाकून एकर क्षेत्र पीक लागवडयोग्य केले व बंधाºयात वाहून आलेल्या दगडगोटे व शेतात टाकण्यास योग्य नसणारी माती वापरून दोन शेततळे आणि १० एकराची बांध बंदिस्ती केली. त्यामुळे येथील तीन वाड्यांतील रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटला आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकWaterपाणी