शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दापूर येथे युवा मित्र संस्थेकडून जलसाक्षता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 17:50 IST

सिन्नर : तालुक्यातील लोणारवाडी येथील युवा मित्र या संस्थेच्या वतीने दापूर येथे शेतकऱ्यांसाठी जलसाक्षरता अभियान राबविण्यात आले. सुनील पोटे यांच्या मार्गदर्शनाने युवा मित्र संस्थेचे तालुका समन्वयक प्रीतम लोणारे यांनी ग्रामस्थांना जलसमृद्धी प्रकल्पाद्वारे गावचा विकास कसा करता येईल याबाबत माहिती दिली.

सिन्नर : तालुक्यातील लोणारवाडी येथील युवा मित्र या संस्थेच्या वतीने दापूर येथे शेतकऱ्यांसाठी जलसाक्षरता अभियान राबविण्यात आले. सुनील पोटे यांच्या मार्गदर्शनाने युवा मित्र संस्थेचे तालुका समन्वयक प्रीतम लोणारे यांनी ग्रामस्थांना जलसमृद्धी प्रकल्पाद्वारे गावचा विकास कसा करता येईल याबाबत माहिती दिली.टाटा ट्रस्टच्या सहकार्याने प्रत्येक गावात जलसाक्षरता अभियानाद्वारे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्याचा प्रयत्न युवा मित्र या संस्थेकडून केला जात आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत गावातील नदी-नाले व पाझर तलाव यातील गाळ काढण्याची मोहीम राबवून भूजलपातळीत वाढ करण्यावर भर दिला जाणार असल्याचे लोणारे यांनी सांगितले. गावातील शेतकºयांनी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत मशीन मागणी अर्ज सादर करावयाचा आहे. सदरचा प्रकल्प युवामित्र, महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जाणार आहे. यासाठी संस्थेकडून यंत्रसामुग्री सरकारकडून इंधन खर्च दिला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. उपसलेला गाळ शेतकºयांना मोफत मिळणार असून तो त्यांनी स्वत:च्या वाहनाने त्यांच्या शेतात घेऊन जावा. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत नदी-नाले व पाझर तलाव खोली करणामुळे जलसाठ्यात वाढ होईल. युवा मित्र संस्थेचे गाळ काढणे हा काही व्यवसाय नाही तर या काढलेल्या जलस्त्रोतांचे नाला बंधारा यावर पुढे पाणी वापर संस्था स्थापन करणे व त्याचे नियोजन व व्यवस्थापन गावकºयांककडून करून घेणे हा मुख्य उद्देश असल्याचे तालुका समन्वयक लोणारे यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी