शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांपासून पाणी बंद

By admin | Updated: February 8, 2017 23:56 IST

पांगरी : मनेगावसह १६ गाव पाणीपुुरवठा योजना अडचणीत

 पांगरी : सिन्नर तालुक्यातील पूर्वर् भागातील अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांगरी गावास गेल्या दहा-बारा दिवसांपासून पिण्याचा पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभीच पाणीटंचाईची झळ बसण्यास प्रारंभ झाला आहे. गेल्या पाच वर्षांपासून पांगरी परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. यावर्षी बऱ्यापैकी पाऊस झाला होता; मात्र गेल्या पाच वर्षांत पाऊस झाला नसल्याने फेबु्रवारी महिन्याच्या प्रारंभीच नदी-नाले व बंधाऱ्यातील पाणी आटले असून, ते कोरडेठाक पडले आहे. गावची सार्वजनिक पाणीपुरवठ्याची विहीर जामनदीच्या पात्रात आहे. या विहिरीनेही तळ गाठला आहे. गेल्या महिन्यात दोन-तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता; मात्र गेल्या दहा-बारा दिवसांपासून नळपाणीपुरवठा योजनेला पाणी न आल्याने ग्रामस्थांना टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेत गावाचा काही भागाचा समावेश करण्यात आला आहे. या भागात पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे; मात्र उर्वरित भाग गेल्या दहा ते बारा दिवसांपासून तहानलेला आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्याने महिला व ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. मनेगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुुरवठा सुरळीत करून पांगरीकरांची टंचाई दूर करण्याची मागणी ग्रामस्थ व महिलांनी केली आहे. (वार्ताहर)