शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

अनेकांच्या मनसुब्यावर फिरले पाणी

By admin | Updated: January 14, 2017 00:17 IST

आरक्षणाचा फटका : नारायणगाव गणात चुरशीची लढत

 योगेश सगर कसबे सुकेणेकसबे सुकेणे गट यंदा अनुसूचित जमाती वर्गासाठी आरक्षित झाल्याने या गटातील विद्यमान सदस्यासह अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले आहे. गेल्या निवडणुकीत या गटावर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व राहिले. यंदा सेनेपाठोपाठ राष्ट्रवादी आणि भाजपाने येथे कंबर कसली आहे. या गटात नारायणगाव गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने याच गणात यंदा चुरस दिसेल़निफाड तालुक्याच्या राजकारणात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या या गटात आरक्षणामुळे अनेकांची गैरसोय झाली आहे. विद्यमान आमदार अनिल कदम ज्या गटातून जिल्हा परिषदेत निवडून गेले तो ओझर टाऊनशिप - सुकेणा हा पूर्वीचा गट होता. २००७च्या पुनर्निर्मितीमध्ये कसबे सुकेणे हा स्वतंत्र गट झाला. २००७च्या निवडणुकीत हा गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आला. राष्ट्रवादीचे भास्कर गांगुर्डे येथून विजयी झाले तर कसबे सुकेणे गणातून वडाळीचे राष्ट्रवादीकडून सुभाष होळकर, तर सेनेकडून दीक्षीच्या लता गाढवे निवडून आल्या. लताताई गाढवे यांनी याच गणातून निफाड पंचायत समितीचे सभापतिपद भूषविले. २०१३च्या निवडणुकीत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत कसबे सुकेणे गटावर परत भगवा फडकविला. गटात सेनेच्या भावना विश्वास भंडारे, गणात रोहिणी झाल्टे आणि विनायक चौधरी हे तिघेही शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. काँग्रेस आणि शिवसेना-भाजपाने गेली निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. खेरवाडी गाव आणि दीक्षी गावांची मतविभागणी या निवडणुकीत निर्णायक ठरत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पराभवाला कारणीभूत ठरली. या गटात यंदा सेनेकडून गड काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी, भाजपाने संघटन मजबूत केले आहे. गटात शिवसेनेचे बाळासाहेब जाधव, अशोक भंडारे, केशव झाल्टे, विनायक चौधरी यांचे संघटन आहे. नारायणगाव गणात सेनेचे प्राबल्य अधिक असल्याने या गणात शिवसेनेचे स्थानिक नेते आनंदराव बोराडे, यशवंत चौधरी, विजय मोगल, वसंत चौधरी, चिंधू तात्या चौधरी, केशवराव बोरस्ते, विलास गडाख, राजेंद्र पवार, विजय नागरे, सुभाष आवारे, वसंत गुरगुडे यांच्या भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या डझनभर संख्येमुळे या गणात तिकीट वाटपात शिवसेनेला अनेकांची मनधरणी करावी लागणार हे मात्र नक्की. काँग्रेसचे राजेंद्र मोगल, प्रतापराव मोगल, सर्जेराव मोगल, दीपक बोरस्ते, कमलेश भंडारे, राष्ट्रवादीचे नाना पाटील, भाऊसाहेब भंडारे, अश्विनी मोगल, माजी सदस्य भास्कर गांगुर्डे, आनंद भंडारे, सचिन पाटील, संदीप पवार, पिंपळगाव बाजार समितीचे उपसभापती निवृत्ती धनवटे यांनीही उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. भाजपाकडून इच्छुकांची संख्या जेमतेम असली तरीही सुदाम जाधव, दत्ता पाटील आदिंनी पक्षीय पातळीवर तयारी सुरू केली आहे. कसबे सुकेणे गट जिल्हा परिषदेसाठी उमेदवार देण्यासाठी स्थानिक पुढाऱ्यांनी मात्र उमेदवारांची चाचपणी करून विजयासाठी रणनीती आखण्यास प्रारंभ केला आहे. नारायणगाव गणात अटीतटीची लढत होईल. या गणातून उमेदवारी मिळविण्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात चढाओढ आहे.