शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भंगार बाजाराला प्रतिबंध घालण्यासाठी टेहळणी पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:33 IST

सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बाजार बसू नये यासाठी महापालिका आणि पोलीस आयुक्तालय यांचे संयुक्त टेहळणी पथक नियुक्त केले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे.

नाशिक : सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बाजार बसू नये यासाठी महापालिका आणि पोलीस आयुक्तालय यांचे संयुक्त टेहळणी पथक नियुक्त केले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे.  महापालिकेने जानेवारी २०१७ मध्ये भंगार बाजार हटविण्याची मोहीम फत्ते केली होती. परंतु, काही महिन्यांतच पुन्हा एकदा भंगार बाजार बसला. त्यामुळे महापालिकेला पुन्हा कारवाईचे हत्यार उपसावे लागले. आता महापालिकेने कारवाई पूर्ण केल्यानंतर पुन्हा बाजार बसू नये याकरिता खबरदारी घेतली जाणार आहे. त्यासाठी सातपूर-अंबड लिंकरोडवर कायमस्वरूपी टेहळणी पथक तैनात केले जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे.  भंगार बाजार पुन्हा बसू नये, याकरिता पोलिसांची मदत लागणार असून, संयुक्त पथक स्थापण्यासाठी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. दरम्यान, भंगार बाजाराच्या जागेवर नियमानुसारच बांधकामांची परवानगी दिली जाणार आहे. बेकायदेशीररीत्या कोणतेही बांधकाम तेथे उभे राहू दिले जाणार नाही. नगररचना विभागाकडे ज्या व्यावसायिकांनी अर्ज दाखल केले आहेत त्यांना नियमानुसार ६० दिवसांच्या आत परवानगी दिली जाईल. दरम्यान, महापालिकेमार्फत सुरू असलेल्या मोहिमेत जप्त करण्यात आलेला भंगार माल सातपूर क्लब हाउसच्या जागेत ठेवला जात आहे. नियमानुसार लिलाव प्रक्रिया राबवून त्याची विल्हेवाट लावली जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.