शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भंगार बाजारला प्रतिबंध घालण्यासाठी टेहळणी पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 14:29 IST

नाशिक - सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बाजार बसू नये, यासाठी महापालिका आणि पोलीस आयुक्तालय यांचे संयुक्त टेहळणी पथक नियुक्त केले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे.महापालिकेने जानेवारी २०१७ मध्ये भंगार बाजार हटविण्याची मोहीम फत्ते केली होती. परंतु, काही महिन्यांतच पुन्हा एकदा ...

ठळक मुद्देआयुक्त : मनपा-पोलिसांचा संयुक्तपणे राहणार वॉच

नाशिक - सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बाजार बसू नये, यासाठी महापालिका आणि पोलीस आयुक्तालय यांचे संयुक्त टेहळणी पथक नियुक्त केले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे.महापालिकेने जानेवारी २०१७ मध्ये भंगार बाजार हटविण्याची मोहीम फत्ते केली होती. परंतु, काही महिन्यांतच पुन्हा एकदा भंगार बाजार बसला. त्यामुळे महापालिकेला पुन्हा कारवाईचे हत्यार उपसावे लागले. आता महापालिकेने कारवाई पूर्ण केल्यानंतर पुन्हा बाजार बसू नये याकरीता खबरदारी घेतली जाणार आहे. त्यासाठी सातपूर-अंबड लिंकरोडवर कायमस्वरुपी टेहळणी पथक तैनात केले जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे. भंगार बाजार पुन्हा बसू नये, याकरीता पोलिसांची मदत लागणार असून संयुक्त पथक स्थापण्यासाठी पोलिस आयुक्तांशी चर्चा केली जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. दरम्यान, भंगार बाजाराच्या जागेवर नियमानुसारच बांधकामांची परवानगी दिली जाणार आहे. बेकायदेशीररित्या कोणतेही बांधकाम तेथे उभे राहू दिले जाणार नाही. नगररचना विभागाकडे ज्या व्यावसायिकांनी अर्ज दाखल केले आहेत त्यांना नियमानुसार ६० दिवसांच्या आत परवानगी दिली जाईल. दरम्यान, महापालिकेमार्फत सुरू असलेल्या मोहिमेत जप्त करण्यात आलेला भंगार माल सातपूर क्लब हाऊसच्या जागेत ठेवला जात आहे. नियमानुसार लिलाव प्रक्रिया राबवून त्याची विल्हेवाट लावली जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.