शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हेलिकॉप्टरद्वारे सभास्थळावर ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 01:43 IST

तपोवनमधील साधुग्रामच्या जागेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी (दि.१९) सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर सभास्थळावर मंगळवारपासूनच सुरक्षा यंत्रणांनी सूक्ष्म नजर केंद्रित केली आहे. मंगळवारी सायंकाळी दोन हेलिकॉप्टरद्वारे तपोवन-साधुग्राम परिसरावर ‘वॉच’ ठेवण्यात आला.

नाशिक : तपोवनमधील साधुग्रामच्या जागेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी (दि.१९) सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर सभास्थळावर मंगळवारपासूनच सुरक्षा यंत्रणांनी सूक्ष्म नजर केंद्रित केली आहे. मंगळवारी सायंकाळी दोन हेलिकॉप्टरद्वारे तपोवन-साधुग्राम परिसरावर ‘वॉच’ ठेवण्यात आला. या भागात काळ्या रंगाचे हेलिकॉप्टरने सातत्याने घिरट्या घातल्याचे दिसून आले.मोदी यांच्या सुरक्षेबाबत केंद्रीय सुरक्षा दले सतर्क झाले आहेत. मोदी यांना ७ स्तरीय सुरक्षा प्रदान करण्यात आल्याने त्यांच्या नाशिक दौऱ्याविषयी सर्वच सुरक्षा यंत्रणांकडून चोख सुरक्षेचे नियोजन केले जात आहे. दस्तूरखुद्द राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी मंगळवारी शहराच्या पोलीस अकादमीत सुरक्षाव्यवस्थेचा आढावा अधिकाऱ्यांकडून जाणून घेतला. त्याचप्रमाणे मोदी यांच्या वाहतुकीपासून सर्वच प्रकारे सुरक्षेची खास जबाबदारी पार पाडणाºया विशेष सुरक्षा दलाचे (एसपीजी) कमांडोदेखील सभास्थळासह ओझर विमानतळ ते तपोवनापर्यंतच्या रस्ते मार्गाच्या सुरक्षेचा आढावा घेत आहे.मोदी यांच्या सुरक्षेविषयी विशेष काळजी पोलीस प्रशासनासह सर्वच सुरक्षा यंत्रणांकडून घेतली जात आहे. तपोवनातील साधुग्रामसह सर्व परिसरात संरक्षण खात्याचे हेलिकॉप्टर वगळता अन्य सर्व प्रकारच्या हवाई साधनांनाही ‘आकाशबंदी’ करण्यात आली आहे. सभेचा परिसरत सुरक्षा दलाच्या नजरेत असून, येथे येणारी वाहने, लोकांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. मंगळवारी सायंकाळपासूनच सभेच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढविला गेला आहे.एसपीजी, एसपीयू अन् फोर्स-१चे कमांडोमोदी यांच्या सुरक्षेसाठी दिल्ली येथील विशेष सुरक्षा दलाचे (एसपीजी) कमांडो तैनात राहणार आहे. तसेच सभास्थळी यांसह विशेष सुरक्षा गट, मुंबई आणि फोर्स-१ मुंबईचे विशेष कमांडोही बंदोबस्तावर राहणार आहेत. कोणत्याही प्रकारे कायदासुव्यवस्थेचा प्रश्न उद््भवू नये, यासाठी पोलीस प्रशासनासह केंद्रीय सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.धातुशोधक यंत्रांची उभारणीसाधुग्राममध्ये गुरुवारी होणाºया मोदी यांच्या सभेसाठी येणाºया प्रत्येक नागरिकाला सभामंडपात धातुशोधक यंत्राद्वारे तपासणी करून प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी मुंबई, सांगलीसह अन्य ठिकाणांहून आलेल्या पोलिसांनीही सोबत धातुशोधक यंत्रणा आणली आहे. सभेच्या सर्व प्रवेशद्वारावर धातुशोधक कमानी उभारल्या जाणार आहेत. एकूणच सभेसाठी येणाºया प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेच्या कारणास्तव कसून चौकशी करण्यात येणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकNarendra Modiनरेंद्र मोदी