शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वटार : उत्तर महाराष्टÑातील नामवंत पहिलवानांची हजेरी चौंधाणे येथे रामगीरबाबा यात्रोत्सवात कुस्त्यांची दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:10 IST

वटार : येथे रामगीरबाबांनी संजीवन समाधी घेतली होती, त्या घटनेस उजाळा म्हणून गावकऱ्यांनी आजतागायत बाबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यात्रोत्सवाची परंपरा चालू ठेवली आहे.

वटार : येथे रामगीरबाबांनी संजीवन समाधी घेतली होती, त्या घटनेस उजाळा म्हणून गावकऱ्यांनी आजतागायत बाबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यात्रोत्सवाची परंपरा चालू ठेवली आहे. यात्रोत्सवात कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला. यात सात दिवस नामवंत कीर्तनकारांनी हजेरी लावली. यात सुप्रसिद्ध बालकीर्तनकार ऋषप्रभादेवी (वृंदावन) यांचे कीर्तन झाले. ग्रामस्थ, ग्रामपंचायत प्रशासन व सटाणा शहरातील वात्सल्य हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले. डॉ. राहुल सोनवणे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मनीषा सोनवणे व त्यांच्या सहकाºयांचा समावेश होता. सायंकाळी गावातून ग्रंथदिंडी व महंत रामगीरबाबा पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. दुसºया दिवशी प्रकाश मोरे यांच्याकडून महाप्रसाद देण्यात आला.मालेगाव तालुक्यातील आघार येथील साईगिरणा दूध संस्था संचालक मल्ल संजय (बाबा) हिरे याने सलग कुस्त्या जिंकल्या. काही लढती अटीतटीच्या होऊन निर्णय लागू न शकल्याने दोघांना समसमान बक्षीस वाटून देण्यात आले. पुरुष गटात प्रवीण (लोहोणेर) व मार्तंड (मनमाड) यांच्यात कुस्ती झाली. त्यात मनमाडच्या मार्तंडने बाजी मारली. महिला गटात प्रतीक्षा (नांदगाव) व शिवानी (मनमाड) यांच्यात लढत झाली. त्यात मनमाडच्या शिवानीने ही लढत जिंकली. कुस्ती दंगलीसाठी शिवसेनेचे लालचंद सोनवणे, अनिल पाटील, रवि बिरारी, विठ्ठल बागुल, दिनकर खैरनार (वटार) यांचा समावेश होता. पंच म्हणून प्रदीप मोरे, लाला मोरे, दीपक मोरे, राजाराम पवार, रमेश बर्डे, बाळासाहेब पवार यांनी काम पाहिले, तर पवन मोरे व प्रशांत शेवाळे यांनी गुणलेखन केले. यावेळी कोमल खैरनार (कुस्ती), मोहिनी खैरनार (बॉक्सिंग), पवन मोरे, प्रशांत शेवाळे (मॅरेथॉन) या चौंधाणे येथील खेळाडूंना त्यांच्या जिल्हा व राज्यस्तरावरील प्राविण्याबद्दल गौरविण्यात आले.