वीज तारा भूमिगत करा
नाशिक : शहरातील विविध भागांत अनेक कामे प्रलंबित असून, त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. सिडको, सातपूर भागांत अनेक ठिकाणी वीज वाहिनीच्या तारा नागरिकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे. या सर्व तारा भूमिगत करण्यात याव्यात, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
वाहतुकीचा खोळंबा दूर करा
नाशिक : द्वारका परिसरात होणारा वाहतुकीची खोळंबा टाळण्यासाठी या ठिकाणी करण्यात आलेल्या भुयारी मार्गातून दुचाकी व चारचाकी वाहने जाऊ शकतील, अशी व्यवस्था करावी, स्मार्ट सिटी योजनेंतर्गत अशी जनतेच्या हिताची कामी हाती घेण्यात यावीत, असे मत शशिकांत पवार, राजेश अहिरे यांनी व्यक्त केले आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
नाशिक : स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराच्या मध्यवर्ती भागात खोदकाम करून नको तो तमाशा केला जात आहे. लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. ही चुकीची कामे त्वरित थांबवावीत; अन्थथा रिपब्लिकन सुरक्षा महासंघ कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासेल व कामे बंद पाडेल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
उघड्यावर मांस विक्री
नाशिक : सातपूर परिसरात काही ठिकाणी उघड्यावर होणारी मांस विक्री त्वरित बंद करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. उघड्यावर मांस विक्री होत असल्यामुळे या ठिकाणाहून जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत.