शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘कमवा व शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांनी साकारली वारली पेंटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:56 IST

नाशिक : उद्यानातील हिरवी झाडी अन् झाडांच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेल्या भिंतीवर काढण्यात आलेली सुंदर अशी वारली पेंटिंग हे दृश्य आहे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी आर्ट्स अ‍ॅण्ड आरवायके सायन्स महाविद्यालयातील़ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ‘कमवा व शिका’ या योजनेतील सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्यातील वारली चित्रकलेची प्रतिभा या भिंतीवर चितारली असून, ही चित्रे विद्यार्थ्यांच्या ...

ठळक मुद्दे एचपीटी महाविद्यालय : उद्यानातील भिंती व कारंजाही वारलीने सजलाविद्यार्थ्यांच्या आकर्षणाचे केंद्र

नाशिक : उद्यानातील हिरवी झाडी अन् झाडांच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेल्या भिंतीवर काढण्यात आलेली सुंदर अशी वारली पेंटिंग हे दृश्य आहे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी आर्ट्स अ‍ॅण्ड आरवायके सायन्स महाविद्यालयातील़महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ‘कमवा व शिका’ या योजनेतील सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्यातील वारली चित्रकलेची प्रतिभा या भिंतीवर चितारली असून, ही चित्रे विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे़

महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच काम करण्याची संधी मिळावी व या कामातून मिळणारा आर्थिक मोबदला शिक्षणासाठी मिळावा, या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाविद्यालयांमध्ये ‘कमवा व शिका’ ही योजना राबविली जाते़ एचपीटी महाविद्यालयात या योजनेत सहभागी झालेला विद्यार्थ्यांचा एक गट गत दहा दिवसांपासून महाविद्यालयातील उद्यान आकर्षक करण्यासाठी काम करतो आहे़ उद्यानाच्या भिंतीवर वारली चित्रे काढली जात असून, यामुळे महाविद्यालयाच्या उद्यानाच्या आकर्षणात भर पडते आहे़

एचपीटीचे महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही़ एऩ सूर्यवंशी यांच्या कार्यालयाजवळ असलेल्या या मोठ्या उद्यानात विविध प्रकारचे वृक्ष आहेत. या उद्यानातून विद्यार्थ्यांना पायी जाण्यासाठी रस्ते असून, उद्यानाला छोट्या-छोट्या भिंती बांधण्यात आल्या आहेत़ या भिंतींवर कमवा व शिका योजनेतील विद्यार्थी प्राध्यापक प्रशांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐश्वर्या कुवटेकर, सचिन वळवी, अजय महाले, खुशी साळवे, पूनम सोनवणे आणि लोकनाथ जाधव हे वारली पेंटिंग करीत आहेत़ या उद्यानात एका पाण्याचा कारंजाही तयार करण्यात आला असून, या कारंजावरही सुुंदर अशी वारली पेंटिंग काढली आहे़

वारली कलेस प्रोत्साहन

महाविद्यालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेचा आविष्कार दाखवून ही वारली चित्रे काढली आहेत़ विशेष म्हणजे यातील चार ते पाच विद्यार्थी हे पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील आहेत़ वारली कलेस प्रोत्साहन देण्याबरोबरच उद्यानाचा आकर्षकपणादेखील वाढला आहे़- प्रशांत देशपांडे, प्राध्यापक, एचपीटी महाविद्यालय

टॅग्स :collegeमहाविद्यालयNashikनाशिक