शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून युनिक ग्रुपच्या वतीने पाटील गार्डन आणि आयटीआय कॉलनी परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण सुवर्णा घोडके व अंजली लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रभागाचे नगरसेवक सतीश सोनवणे यांनी स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. पाटील गार्डन व आयटीआय कॉलनी परिसरात नागरिकांच्या मागणीनुसार दोन दिवसांत पाच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. यावेळी अनिकेत सोनवणे, सुधाकर गायधनी, अशोक पाटील,
किशोर शिरसाठ, शिवाजी लोखंडे, नवनाथ चव्हाण आदी उपस्थित होते.
कोट== प्रभाग भयमुक्त करण्याचे दिलेले आश्वासन टप्प्याटप्प्याने चौकाचौकांत स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून पूर्ण करीत आहे. परिसरात ५२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्यामुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्यात पोलिसांना मदतच झाली असून गुन्हेगारीस आळा बसला आहे.
- नगरसेवक सतीश सोनवणे )
(फोटो ०७ सीसीटीव्ही)