पंचवटी : हिरावाडीतील प्रभाग क्रमांक ३ मधील त्रिकोणी बंगला बन्सीपार्क येथिल अंतर्गत रस्ते खडीकरण कामाचा शुभारंभ प्रभागाचे नगरसेवक रुचि कुंभारकर, सुनिता शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. प्रभागातील बन्सी पार्क या भागात नागरी वसाहत वाढल्याने अंतर्गत रस्ते खडीकरण करावे अशी मागणी स्थानिक नागरीकांनी केली होती. खडीकरण नसल्याने पावसाळयात नागरीकांना चिखलातूनच मार्गक्रमण करावे लागायचे त्यामुळे या रस्त्याचे खडीकरण केल्यानंतर नागरीकांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या खडीकरण कामाच्या शुभारंभाप्रसंगी अशोक कुमावत, पदमाकर वडघुले, सुकदेव फडोळ शंकर गोवर्धने आदिंसह नागरीक उपस्थित होते. (वार्ताहर) फोेटो कॅप्शन- हिरावाडीतील प्रभाग क्रमांक ३ मधील बन्सीपार्क येथे अंतर्गत कॉलनी रस्ता खडीकरण कामाचा शुभारंभ करतांना नगरसेवक रुचि कुंभारकर, सुनिता शिंदे, मिलींद गोसावी, सौरभ सोनवणे, विजय जोशी, मनोज खैरनार आदिंसह नागरीक,
प्रभाग ३ रस्ता खडीकरण कामाचा शुभारंभ
By admin | Updated: May 24, 2014 01:01 IST