शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग २९ मध्ये महाकाली चौक यांसह परिसरात दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:41 IST

येथील प्रभाग क्रमांक २९ मधील दत्त चौक, महाकाली चौक यांसह परिसरात काही दिवसांपासून दूषित व गढूळयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

सिडको : येथील प्रभाग क्रमांक २९ मधील दत्त चौक, महाकाली चौक यांसह परिसरात काही दिवसांपासून दूषित व गढूळयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत प्रभागाच्या नगरसेवकांनी पहाणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. पाणीपुरवठा त्वरित सुरळीत न झाल्यास अभिनव पद्धतीने आंदोलन उभारणार असल्याचे सांगितले.  सिडको भागात दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या अनेक तक्रारी येत असतानाही संबंधित विभागाकडून याबाबत लक्ष दिले जात नाही. प्रभाग क्रमांक २९ मधील दत्त चौक, महाकाली चौक व परिसरातील नागरिकांचे या दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयात तक्रार दिल्यानंतरही स्वच्छ पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत आज प्रभागाचे नगरसेवक मुकेश शहाणे, छाया देवांग तसेच रमेश उघडे, दिलीप देवांग यांनी दूषित पाणीपुरवठा होत असलेल्या भागात पहाणी केली. यावेळी कल्पना चव्हाण, सुभाष जाधव, विलास भामरे, राजेश सैंदाणे, मीना वैष्णव, हरिभाऊ आहेर, सुभाष जाधव यांसह नागरिक व नगरसेवकांनी दूषित पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी केल्या.मनपाच्या संबंधित विभागाच्या गलथान व नियोजनशून्य कारभाराबाबत प्रभागात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी कायमच दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रारही नागरिक करीत असतात. दत्त चौकातील पाणीपुरवठा त्वरित सुरळीत न झाल्यास महिलावर्गास बरोबर घेत मनपा कार्यालयावर आंदोलन करणार आहे.  - छाया देवांग, नगरसेवक

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाwater pollutionजल प्रदूषण