शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग १३ : शांततेत प्रक्रिया पूर्ण, आज मतमोजणी पोटनिवडणुकीत ४० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:11 IST

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ च्या रिक्त जागेसाठी शुक्रवारी (दि. ६) झालेल्या पोटनिवडणुकीत ३९.७१ टक्के मतदान झाले. संवेदनशील गणल्या जाणाऱ्या या प्रभागात कुठेही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान झाले.

ठळक मुद्देसुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी मतदान मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ च्या रिक्त जागेसाठी शुक्रवारी (दि. ६) झालेल्या पोटनिवडणुकीत ३९.७१ टक्के मतदान झाले. संवेदनशील गणल्या जाणाऱ्या या प्रभागात कुठेही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान झाले. पहिल्या सहा तासांत अवघे १७ टक्के मतदान झाले होते. मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून न आल्याने मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाला. शनिवारी (दि. ७) सकाळी १० वाजेपासून गंगापूररोडवरील शिवसत्य मंडळाच्या सभागृहात मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून, दुपारी १२ वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे. प्रभाग क्रमांक १३ (क) मधील मनसेच्या नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी शुक्रवारी (दि. ६) मतदान घेण्यात आले. निवडणूक रिंगणात आठ उमेदवार होते. त्यात मनसेच्या अ‍ॅड. वैशाली मनोज भोसले, शिवसेनेच्या स्नेहल संजय चव्हाण, भाजपाच्या विजया हरीश लोणारी यांच्यासह अपक्ष उमेदवार ज्योती नागराज पाटील, समिना कयूम पठाण, अवंतिका किशोर घोडके, माजी नगरसेवक व राष्टÑवादीच्या बंडखोर उमेदवार रंजना ज्ञानेश्वर पवार आणि समिमा मकसूद खान यांचा समावेश होता. अपक्ष उमेदवार अवंतिका घोडके यांनी सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता. प्रभागात ६१ मतदान केंद्र उभारण्यात आले होते. त्यासाठी २०४ मतदान अधिकारी, ९ झोनल अधिकारी, ६८ केंद्राध्यक्ष, ६८ मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. सकाळी ७.३० वाजता मतदानाला प्रारंभ झाला. शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा बसत असल्याने सकाळच्या वेळी मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडतील अशी अपेक्षा होती. परंतु, मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. बºयाच मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता. दुपारी १.३० वाजेपर्यंत अवघे १७.१९ टक्के मतदान नोंदवले गेले. त्यात ४६६० पुरुष, तर ३४५९ स्त्री मतदारांचा समावेश होता. त्यानंतर, दुपारी ३.३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी २५.४२ टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचली. सायंकाळी ५.३० वाजता मतदान आटोपले त्यावेळी ४७ हजार २२८ पैकी १८ हजार ७५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. अखेरच्या दोन तासांत काही मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी बघायला मिळाली. दर निवडणुकीत बी. डी. भालेकर शाळेतील मतदान केंद्रावर अखेरच्या तासाभरात मतदारांची प्रचंड गर्दी बघायला मिळायची. परंतु, पोटनिवडणुकीत या केंद्रावर तुरळक गर्दी पाहायला मिळाली. बुधवार पेठेतील रंगारवाडा शाळेत मात्र गर्दी झाली होती. दिवसभर सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. अखेरच्या टप्प्यात मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आटापिटा दिसून आला.