तळेगाव रोही : वाकी खुर्द येथील शेतकरी श्रीराम हरिभाऊ पवार यांचा मुलगा प्रतीक पवार (१३) हा पाणी ओढण्यासाठी विहिरीवर गेला असता पाय घसरून विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. चांदवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रतीक हा वाहेगाव साळ येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात इयत्ता सातवीत शिकत होता. (वार्ताहर)
वाकी खुर्दला मुलाचा विहिरीत पडून मृत्यू
By admin | Updated: September 5, 2016 00:30 IST