शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वणी-सापुतारा रस्त्याच्या कामामुळद्राक्षबागा धोक्यात येण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:43 IST

सापुतारा रस्ता रुंदीकरणाच्या संथगतीने होणाऱ्या कामामुळे परिसरातील शेकडो एकर द्राक्षबागांचे नुकसान होण्याची भीती वर्तविली जात असल्याने बागायतदार शेतकरी चिंतित असून, याबाबत त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

वणी : सापुतारा रस्ता रुंदीकरणाच्या संथगतीने होणाऱ्या कामामुळे परिसरातील शेकडो एकर द्राक्षबागांचे नुकसान होण्याची भीती वर्तविली जात असल्याने बागायतदार शेतकरी चिंतित असून, याबाबत त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.द्राक्ष पिकाचा हंगाम संपवून शेतकºयांनी खरड छाटणीस सुरुवात केली आहे. यानंतर द्राक्षबागेला नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होते. या नवीन पालवीवर तसेच रस्त्याने ये-जा करणाºया शेकडो वाहनांच्या वाहतुकीमुळे उडणारी धूळ द्राक्षकाडीवर व पानांवर बसत असल्याने प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावते व अन्नद्रव्यनिर्मितीच्या कामात बाधा येण्याची शक्यता असते.यामुळे पुढील वर्षाचा द्राक्ष हंगाम पूर्णत: नुकसानीचा ठरेल, अशी भीती द्राक्ष उत्पादक शेतकºयांना वाटू लागली आहे.याबाबत करंजखेड फाटा, चौसाळे, खोरीफाटा, हस्ते दुमाला, पिंप्रीअंचला, माळेदुमाला, पुणेगाव फाटा, पांडाणे, अंबानेर, सागपाडा तसेच कसबे वणी येथील शेतकºयांनी संबंधित ठेकेदाराकडे वेळोवेळी तोंडी व प्रत्यक्षपणे रस्त्यावरील कामावर नियमितपणे पाणी मारण्याची विनंती केली; परंतु या मागणीकडे पूर्णता दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी बांधवांनी केलाआहे.चालू हंगामात द्राक्ष पिकास योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या सर्व बाबींचा परिणाम आर्थिक रसद पुरविणाºया संस्थांवर पडणार असल्याने होणाºया नुकसानीस जबाबदार कोण, असा प्रश्न उभा राहिला आहे.परिसरातील शेतकरी महेंद्र बोरा, विलास कड, विजय धुळे, संपत चौरे, बबन धुळे, निवृत्ती धुळे, विलास दुगजे, देवीदास बोरसे, नितीन पाटील यांनी सांगितले की, स्थानिक लोकप्रतिनिधींना शेतकºयांचे होणारे नुकसान लक्षात आणून दिले; मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या शेतकºयांनी केला आहे. सदर बाबीकडे संबंधितांनी वेळीच लक्ष न दिल्यास शेतकरी बांधव रस्त्यावर उतरतील तसेच भविष्यात होणाºया नुकसानीची सर्वस्वी जबाबदारी शासनाची व ठेकेदाराची असेल, असा इशारा शेतकºयांनी दिला आहे. या रस्त्यावर येण्यासाठी एकेरी मार्गदेखील अडचणीचा असल्याने वणी शिवारात अपघाताची संख्या वाढली असल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी आहे. रस्त्याचे काम जलद गतीने व्हावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती