वणी : वणी-नाशिक हा रस्ता चौपदरी करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यवाही करावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य छाया गोतरणे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. सप्तशृंगगडावर दर्शनासाठी शंदे आले होते. त्यावेळी वणी येथे त्यांची भेट घेऊन ही मागणी करण्यात आली.नाशिक-वणी हा मार्ग वर्दळीचा व प्रचंड वाहतुकीचा ताण असणारा मार्ग असून, गुजरात राज्यात जाणारी व येणारी वाहनांची संख्या मोठी आहे. तसेच कृषी उत्पादित माल वाहतूक व्यावसायिक प्रातिष्ठाण औद्योगीक क्षेत्र यामधील लहान व अवजड स्वरूपाच्या वाहतुकीमुळे या मार्गावर प्रचंड ताण पड़त आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला द्राक्ष, कांदा व टमाटा मालाची वाताहात होते. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याची मागणी मागणी अॅड विलास निरगुडे, राजेंद्र गोतरणे, भोजराज चौधरी, संपत पुरकर, सचिन खााबिया यांनी केली. ( वार्ताहर)
वणी-नाशिक रस्ता चौपदरी व्हावा बांधकाममंत्र्यांना साकडे
By admin | Updated: April 18, 2017 01:48 IST