शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

न्यायडोंगरीत पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:39 IST

पावसाळा सुरू होऊन तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लोटला असताना न्यायडोंगरी परिसरात मात्र तुरळक शिडकाव्याशिवाय जोरदार पाऊस झाला नसल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे.

न्यायडोंगरी : पावसाळा सुरू होऊन तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लोटला असताना न्यायडोंगरी परिसरात मात्र तुरळक शिडकाव्याशिवाय जोरदार पाऊस झाला नसल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. सलाईनवर जगत असलेल्या पिकांनी मात्र माना टाकायला सुरु वात केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांच्या भटकंतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. टँकर भरण्यासाठीदेखील पाणी मिळत नसल्याने पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे जनावरे जगविण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  ऐन पावसाळ्यात पाण्याची दाहकता निर्माण झाल्याने भविष्यात पाणी मिळेल की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. या भागात पावसाने उघडीप दिल्याचेच दिसून येत आहे. गेल्या तीन-चार वषाह्ण्रपासून न्यायडोंगरी परिसरात पावसाने पाठ फिरवलेली आहे. यावर्षी पावसाळा चांगला होईल असा अंदाज वर्तवण्यात आला; परंतु केवळ शिडकाव्याशिवाय मुसळधार पाऊस पडला नाही. त्यामुळे नदी, नाले, बंधारे, विहिरी अजूनही कोरडेठाक असून, तहानलेले आहेत. उर्वरित दिवसांत पाऊस पडेल की नाही याची शास्वती दिसत नसल्याने ग्रामस्थ चिंतित आहे.मुसळधार पावसाच्या अपेक्षेने पेरणी केलेले कपाशी, भुईमूग, मका आदी पिके पाण्याअभावी डोळ्यासमोर करपताना पाहावे लागत आहे. तर फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना जिवाचे रान करावे लागत आहे. टँकरद्वारे पाणी विकत आणून फळबागांना पाणी द्यावे लागत असून, रोज हजारो रु पये खर्च होत आहेत.  परिसरातील अनेक कुटुंबांची गुजराण शेतमजुरीवर अवलंबून असून, पाऊसपाणी नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे शेतमजुरांना काम मिळत नसल्याने उपासमारीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शासनाने पाण्याची दाहकता लक्षात घेता या भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.कूपनलिकेची पातळीही खालावलीदोन महिन्यांपासून येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरूच आहे. मिळेल त्या ठिकाणी जाऊन पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. गावातील कुपनलिकेच्या पाण्याची पातळी खालावली आहे. विहिरीदेखील तळ गाठल्याने टँकरने पाणीपुरवठा करणेदेखील अवघड झाले आहे. पैसे खर्च करूनही पाणी मिळत नाही अशी स्थिती आहे. पाण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ पाहत असताना ग्रामपालिकेने पाण्यासाठी अनेक प्रयत्न केले; पण फायदा झाला नाही, अशी खंत सरपंच गायत्री मोरे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Waterपाणी