रामदास शिंदे पेठएप्रिल महिना सुरू होताच पेठ तालुक्यातील गाव-वाड्यांना वाढत्या उन्हाबरोबरच पाणीटंचाईच्याही झळा बसू लागल्या आहेत. यावर्षीच्या टंचाई कृती आराखड्यातील तालुक्यातील ३८ गावे व ३३ वाड्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सर्वाधिक पावसाच्या परिसराला घोटभर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.परिणामी दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढत असून, सद्यस्थितीत केवळ एकच टँकरद्वारे तालुक्यास पाणीपुरवठा केला जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे़ पेठ तालुका तसा पावसाचे माहेर घर समजला जात असताना गत अनेक वर्षांपासून तालुक्याचे घसरते पावसाचे प्रमाण पाणीटंचाईला कारणीभूत ठरत असल्याचे जाणवत आहे़ त्यामुळे पावसाळ्यात पडणारे मुबलक पाणी दिसत असताना उन्हाळ्यात मात्र घोटभर पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागत आहे़ पंचायत समिती व तहसील कार्यालयाकडून दरवर्षी पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करण्यात येत असून, याही वर्षी शासनाला सादर केलेल्या कृती आराखड्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजनांचा आराखडा सादर करण्यात आला आहे़विहिरी ठरल्या केवळ शोभेच्या बाहुल्यासन २०१६-१७ च्या टंचाई कृती आराखड्यातील तालुक्यातील ३८ गावे व ३३ वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत़ त्यापैकी बेलपाडा, गारमाळ, वडपाडा, तोंडवळ, डोंगरशेत, मांडणपाडा, हट्टीपाडा, बोंडारमाळ, कोळुष्टी, हनुमंतपाडा, चाफ्याचा पाडा, केळविहीर, लव्हाळी, कासटविहीर, गारमाळ, बेलपाडा, गायधोंड, बाडगी, जामले, पळशी, कायरे, सावर्णा, पातळीपाडा, गणेशवाडी, दाभाडी, गांडोळे, वडपाडा, चौकडा, डोमखडक, मानकापूर, भुवन, सुरगाणे, भाटविहिरा, सादडपाडा, शेरीपाडा, चिखली, नवापाडा, बोरधा, करंजपाडा, नाचलोंढी, कोपुर्णे, शेवखंडी, अंबापूर, कापूरझिरा, जाधवपाडा, झरी, मोंहाचापाडा, मोहदांड, रायतळे, खडकी, आडगाव, अंबास, कळमबारी, आंबे, शिवशेत, गावंध, पळशी, उम्रद, आंबापाणी, माळेगाव, काळुणे, उंबरपाडा, म्हसगण, ससुणे, कोपुर्ली, बेहेडमाळ, पायरपाडा, मांगोणे, हातरूंडी, शिंगदरी, बोरपाडा, मशेत, बिलकस, अभेटी, पिंपळवटी, घोटविहिरा, कहांडोळपाडा, जळे, राजबारी, नालशेत, करंजखेड यासह जवळपास १०० गाव व वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
लोकप्रतिनिधींनी घेतला आढावा
पर्यावरणाचा संदेश देण्याच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्याच्या तोंडावर वृक्षारोपण, पाण्याचे संकलन करण्याबरोबरच पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाणी जपून वापरावे आदिंबाबत रॅलीद्वारे जनजागृती करणे, शहरवासीयांना पालिकेने आतापर्यंत केलेली जनहिताची कामे तसेच भविष्यात करण्यात येणाऱ्या कामांची माहिती करून देण्यासाठी फोटो किंवा वस्तू प्रदर्शन भरविण्यात येईल तसेच शहरातील बचतगटांमार्फत एनयूएलएम/ एसयूएलएम योजनेच्या विविध उपांगांना व्यापक प्रसिद्धी देऊन पात्र नागरिकांना या योजनांचे लाभ घेण्याकरिता प्रवृत्त करण्याबाबत कार्यवाही करावी आदि उपक्र म या सात दिवसांच्या नगरविकास सप्ताहात आयोजित करण्यात आले आहेत.