शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या, मोकाट कुत्र्यांची ग्रामीण भागात दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 17:00 IST

धारणगांव : शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही मोकाट व भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर दिसुन येत आहे. सततच्या दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे पीक जगवतांना शेतकरी मेटाकुटीला येत आहे. त्याचवेळी कष्टाने जगविलेली पिके या मोकाट कुत्र्यांकडुन नाश केली जात आहेत. खेडलेझुंगे, धारणगांव, रुई परिसरातील कांद्याची रोप, इतर शेतातील पिकांची या कुत्र्यांकडुन नासाडी होत आहे. या ...

ठळक मुद्दे ही मोकाट कुत्री शहरातून गावाच्या वेषीवर सोडून दिली जात असल्याचे बालले जात आहे.

धारणगांव : शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही मोकाट व भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर दिसुन येत आहे. सततच्या दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे पीक जगवतांना शेतकरी मेटाकुटीला येत आहे. त्याचवेळी कष्टाने जगविलेली पिके या मोकाट कुत्र्यांकडुन नाश केली जात आहेत. खेडलेझुंगे, धारणगांव, रुई परिसरातील कांद्याची रोप, इतर शेतातील पिकांची या कुत्र्यांकडुन नासाडी होत आहे. या भटक्या कुत्र्यांनी परिसरात दहशत निर्माण केली आहे. बरेच शेतकरी पिकांची राखण करण्यासाठी मजुर ठेवत आहे. या भटक्या जीवांकडुन हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटांचा फटका शेतकरी वर्गाला होत आहे. या कुत्र्यामुळे पिकांची नासाडी होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. याकडे स्थानिक प्रशासन आणि वन विभागाने संयुक्तरित्या गांभीर्याने लक्ष देवुन शेतकऱ्यांचे कसे नुकसान होणार नाही यासाठी प्रयत्न करावे. तसेच या कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे.भटक्या व मोकाट कुत्र्यांनी अनेकांना चावे घेतल्याचे तसेच अपघातही घडले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात या भटक्या कुत्र्यांनी दहशत निर्माण केलेली आहे. ही मोकाट कुत्री शहरातून गावाच्या वेषीवर सोडून दिली जात असल्याचे बालले जात आहे.