शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

घराची भिंत कोसळून चिमुकल्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 16:33 IST

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून झालेला वादळी वारा आणि पावसामुळे देवळा तालुक्यातील सावकी येथे मातीच्या घराची भिंत कोसळून पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीररित्या जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. १६) घडली आहे. 

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून झालेला वादळी वारा आणि पावसामुळे देवळा तालुक्यातील सावकी येथे मातीच्या घराची भिंत कोसळून पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीररित्या जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. १६) घडली आहे. सावकी येथील सोनवणे कुटुंबीय गाढ झोपेत असतांना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आदिवासी वस्तीत राहणाऱ्या पठाण कचरू सोनवणे यांचे मातीचे घर आहे. गाढ झोपेत असलेले सोनवणे, पत्नी सुनीता सोनवणे, त्यांचा पाच वर्षीय मुलगा आकाश सोनवणे व सात वर्षीय मुलगा कुणाल सोनवणे यांच्या अंगावर गुरुवारी (दि. १५) भिंत कोसळली. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी ढिगाऱ्याखाली दबलेल्या सर्वांना बाहेर काढले. यामध्ये तिघांना गंभीर इजा झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना पाच वर्षीय आकाश या चिमुकल्याचा रस्त्यात मृत्यू झाला, तर सुनीता पठाण सोनवणे (२७) व कुणाल पठाण सोनवणे (७) हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पठाण सोनवणे (२९) याला किरकोळ दुखापत झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक