शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विहितगाव-वडनेर रस्ता रूंदीकरणाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:32 IST

विहितगाव-वडनेर रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली असून, रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारक व रहिवाशांनी केली आहे.

नाशिकरोड : विहितगाव-वडनेर रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली असून, रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारक व रहिवाशांनी केली आहे.  विहितगांव-वडनेररोड हा एकपदरी असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागूनच शेती आहे. विहितगाव-वडनेर-पाथर्डीरोडने इंदिरानगर, पाथर्डी फाटामार्गे सातपूर, सिडको, नाशिक शहरात व मुंबई-आग्रा महामार्गाने कुठेही जाता येते. वडनेरगेट ते पाथर्डीफाटापर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यात आल्याने वाहतुकीचा त्रास नसल्याने या मार्गावरील येणाऱ्या-जाणाºयांची संख्या वाढली आहे. मात्र वडनेर-विहितगाव रस्ता हा एकपदरीच असल्याने वाहतुकीसाठी छोटा पडतो. या ठिकाणी शेतातून ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाडी आल्यास त्याला  ओव्हरटेक करून जाणे अनेकवेळा अवघड होऊन जाते. समोरासमोरून दोन मोठी वाहने आली तरदोन्ही वाहनांना एक बाजू रस्त्याखाली उतरावे लागते.  वाहतुकीची वर्दळ कमी, सिग्नल, स्पीड ब्रेकर नाही, सिडको, सातपूर, मुंबई-आग्रा महामार्गावर सहजरीत्या जाता येत असल्याने वाहतुकीची वर्दळ वाढू लागली आहे. नाशिक-पुणे महामार्गाने नाशिकला जाण्यासाठी अनेकजण विहितगाव-वडनेर मार्गाचा वापर करू लागले आहे.रहिवासी त्रस्त, वर्दळ वाढलीबाहेरगावी मुंबई-आग्रा महामार्गाने मालवाहतूक वाहने याच मार्गाचा जास्त वापर करत आहे. यामुळे विहितगाव-वडनेर एकपदवी रस्ता अत्यंत छोटा व अपुरा पडत आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी सातत्याने होत आहे. यामुळे रहिवासी, शेतकरी त्रस्त झाले आहेत. मनपा प्रशासनाने लक्ष घालून विहितगाव-वडनेर रस्त्याचे रूंदीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका